Sharad Pawar, Ajit Pawar, Dhananjay Munde met Shiv Sena leader Sanjay Raut

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. संजय राऊत यांच्यावर लिलावती रुग्णालयात यशस्वीरित्या अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रविवारी त्यांची भेट घेवून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी राऊत यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत.

एका वर्षात दोन वेळा अँजिओप्लास्टी झाली, तरी राऊत साहेबांचे हृदय मजबूत आणि वाणी विरोधकांच्या हृदयात धडकी भरवणारीच आहे! असे ट्विट ही मुंडे यांनी फोटोसह केले आहे.