‘महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगती’साठी शरद पवार उतरले मैदानात; नव्या संकल्पांना दिलं प्रोत्साहन

'स्टार्ट अप महाराष्ट्र ' (Start Up Maharashtra) या महाराष्ट्र सरकारच्या योजनेचा अनिवासी मराठी भारतीयांना लाभ मिळावा व त्यांना आर्थिक गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांसंबंधी आखाती देशातील अनिवासी मराठी भारतीयांच्या विविध संघटनांनी आज शरद पवार यांच्याशी ऑनलाइन झूम मीटिंगद्वारे संवाद साधला.

 मुंबई: महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीसाठी ) ‘Industrial Progress of Maharashtra’) महाराष्ट्र सरकारच्या नव्या औद्योगिक धोरणात अनेक सुविधा आहेत. त्यामुळे अनिवासी भारतीय त्यांचे उद्योग व्यवसाय (Business) राज्यात स्थापित करू शकतात व त्याद्वारे महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत सहभाग घेऊ शकतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांनी आखाती देशातील अनिवासीय मराठी भारतीयांना दिला.

‘स्टार्ट अप महाराष्ट्र ‘ (Start Up Maharashtra) या महाराष्ट्र सरकारच्या योजनेचा अनिवासी मराठी भारतीयांना लाभ मिळावा व त्यांना आर्थिक गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांसंबंधी आखाती देशातील अनिवासी मराठी भारतीयांच्या विविध संघटनांनी आज शरद पवार यांच्याशी ऑनलाइन झूम मीटिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी मराठी अनिवासी भारतीयांच्या काही समस्यांसंदर्भातही शरद पवारांनी चर्चा केली.

अनिवासी मराठी भारतीयांनी गुंतवणूक करावी म्हणून महाराष्ट्र सरकारने ईझ ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत तात्काळ एकल परवाना, जागेची सहज उपलब्धता, गुंतवणूक रकमेइतका परतावा, सूक्ष्म व लघु उद्योग तसेच महिला उद्योगांसाठी वाढीव प्रोत्साहन अशा योजना आखल्यात अशी माहितीही शरद पवारांनी दिली. या सर्व सुविधा सहज मिळाव्यात म्हणून एक खिडकी संकल्पने प्रमाणेच ‘मैत्री गुंतवणूक’ कक्ष स्थापण्यात आल्याचेही त्यांना सांगितले.