विरोधी पक्षनेता कसा असावा याबाबत शरद पवार यांनी फडणवीस यांना मार्गदर्शन केले ; पवार – फडणवीस भेटीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

" शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीकडे राजकीय हेतूने पाहणं चुकीचं आहे. शरद पवारांनी या भेटीत फडणवीस यांना मार्गदर्शन केलं असेल." असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.काल दिवसभर या भेटीची चर्चा होती. या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण मिळणार का? अशीही चर्चा रंगली होती.

    विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीवर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत असे म्हणाले की, ” महविकास आघाडी सरकारला कोणत्या प्रकारचं सहकार्य विरोधी पक्षाने करणं गरजेचं आहे या संदर्भात पवारांनी फडणवीसांना मार्गदर्शन केलं असावं. या राज्याला विरोधी पक्षाची मोठी परंपरा आहे. शरद पवारही विरोधी पक्षनेते होते. त्यांनी त्यावेळी उत्तम काम केलं आहे. त्यामुळे फडणवीसांनी जर त्यांची भेट घेतली असेल तर त्यांना चांगल मार्गदर्शन केलं असावं.” असे संजय राऊत म्हणाले.

    ” शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीकडे राजकीय हेतूने पाहणं चुकीचं आहे. शरद पवारांनी या भेटीत फडणवीस यांना मार्गदर्शन केलं असेल.” असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.काल दिवसभर या भेटीची चर्चा होती. या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण मिळणार का? अशीही चर्चा रंगली होती.

    ” शरद पवारांची तब्येत किंचित बरी नाही, ही सदिच्छा भेट आहे, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील राजकारणात शत्रुत्व घेऊन बसत नाही. जाण-येणं असतं, एकमेकांशी चर्चा असते. त्यामुळे या भेटीकडे राजकीय हेतूने पाहणं चुकीचं आहे.” असे संजय राऊत म्हणाले.