शरद पवारांनी पंतप्रधान मोदींकडे पत्राद्वारे केली ‘ही’ मागणी

शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहित म्हटले आहे की, सहकारी बँकांना आपल्या हेतूमध्ये यशस्वी होण्यासाठी सहकारपणा कायम ठेवला पाहिजे. सहकारी बँकांना खासगी बँकांमध्ये बदलून समस्येचे निराकरण होणार नाही. सहकारी बँकांना खासगी बँकांमध्ये बदलून पैशांचा गैरव्यवहार त्वरित थांबेल असे म्हणणे चुकीचे ठरेल, असे शरद पवारांनी म्हटले आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. त्यांनी या पत्रात सहकारी बँकांमध्ये सरकारच्या वाढत्या हस्तक्षेपाबाबत चिंता व्यक्त केली आहे. शरद पवारांनी सहकारी बँका वाचवण्यासाठी मोदींना पत्र लिहिले आहे. सहकारी बँका ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तसेच माझ्या वक्तव्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी सहमत असतील असे शरद पवारांनी म्हटले आहे. 

शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहित म्हटले आहे की, सहकारी बँकांना आपल्या हेतूमध्ये यशस्वी होण्यासाठी सहकारपणा कायम ठेवला पाहिजे. सहकारी बँकांना खासगी बँकांमध्ये बदलून समस्येचे निराकरण होणार नाही. सहकारी बँकांना खासगी बँकांमध्ये बदलून पैशांचा गैरव्यवहार त्वरित थांबेल असे म्हणणे चुकीचे ठरेल, असे शरद पवारांनी म्हटले आहे.

सहकारी बँकांना आर्थिक शिस्त लागावी याबाबत आम्ही सहमत आहोत. तसेच २०१९-२० या आर्थिक वर्षात सहकारी बँकांमधील गैरव्यवहाराचे प्रमाण कमी झाले आहे. यासोबत रिझर्व्ह बँकेचा हवाला त्यांनी सादर केला आहे. १०० वर्षे जुन्हा आणि देशाच्या आर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देणाऱ्या सहकारी बँकांवर निर्बंध न घालण्याचे आवाहन शरद पवार यांनी पत्राद्वारे केले आहे.