शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; सचिन वाझे प्रकरण गृहमंत्र्यांवर की मुंबई पोलीस आयुक्तांवर बेतणार?

सचिन वाझे प्रकरणानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे, यातच विरोधकांनी सचिन वाझे प्रकरणात आक्रमकपणे ठाकरे सरकारवर गंभीर आरोप लावले आहेत, यातच NIA ने सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे बनलं आहे.

    मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली आहे. दुपारी १२ च्या सुमारास शरद पवार वर्षावर पोहचले होते. वर्षा निवासस्थानी अर्धा ते पाऊण तास शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची चर्चा झाली, शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक म्हणून काम करतात, सचिन वाझे प्रकरणानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांनी सचिन वाझे प्रकरणात आक्रमकपणे ठाकरे सरकारवर गंभीर आरोप लावले आहेत, NIA ने सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे बनलं आहे.

    या संपूर्ण प्रकरणाने महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा मलिन झाली आहे, मुंबई पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वाकारावी, असे म्हणत मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना पदावरून हटवावं अशीही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याचं सांगितलं जात आहे. तारा दुसरीकडे शिवसेनेच्या एका गटातून पोलीस आयुक्तांना हटवायचे झाले तर गृहमंत्र्यांनाही हटवण्याची मागणी होत असल्याचे म्हटले जात आहे. गृहमंत्री अनिल देशमुख संजय राठोड असो वा सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री सरकारची बाजू सांभाळण्यास अपयशी ठरले असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांना हटवण्याची मागणीही जोर धरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

    याशिवाय संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक होणार आहे, या बैठकीत शरद पवार मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेणार आहेत, त्याचसोबत मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीबाबतही चर्चा होईल, त्यामुळे महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.