संपूर्ण कुटुंबियांसोबत शरद पवारांनी घेतला जेवणाचा स्वाद ; पवार फॅमिलीचा डिनर फोटो व्हायरल

दिवाळी असो की पाडवा किंवा इतर कोणतेही सण-उत्सव वा समारंभ असो पवार कुटुंबीय प्रत्येक क्षण एकत्र येऊन आनंदात साजरा करतात. एकत्र येऊन गप्पागोष्टी आणि गाण्याची मैफलही रंगते. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी कुटुंबाच्या या सुखद क्षणाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने तो खूपच व्हायरल होत आहे.

    मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा डिनर घेतानाचा आणखी एक फोटो व्हायरल झाला आहे. एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यासोबत डिनर घेतानाचा हा फोटो नाही तर हा फोटो नसून हा पवार फॅमिलीच्या डिनरचा फोटो आहे.

    दिवाळी असो की पाडवा किंवा इतर कोणतेही सण-उत्सव वा समारंभ असो पवार कुटुंबीय प्रत्येक क्षण एकत्र येऊन आनंदात साजरा करतात. एकत्र येऊन गप्पागोष्टी आणि गाण्याची मैफलही रंगते. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी कुटुंबाच्या या सुखद क्षणाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने तो खूपच व्हायरल होत आहे.

    तीन पिढ्या एकत्र

    सुप्रिया सुळे यांनी आता पवार कुटुंबाचा डिनर घेतानाचा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोत स्वत: शरद पवार, प्रतिभाताई पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे आणि पार्थ पवारांसह शरद पवार यांचे इतर नातवंडे दिसत आहे. डिनर सुरू होण्यापूर्वी डायनिंग टेबलवरचा हा फोटो आहे. या फोटोत कुटुंबातील एकूण १२ जण दिसत असून पवार कुटुंबाच्या एकूण तीन पिढ्यांचा हा फोटो आहे. फोटो काढताना हास्यविनोद झाल्याचं या फोटोतील सर्वांच्या चेहऱ्यावरून हसण्यातून दिसत आहे.

    या फोटोत अजित पवार हे शरद पवारांच्या एकदम जवळ बसलले दिसत आहेत. अजित पवारांच्या देहबोलीवरून त्यांनी पवारांशी गंभीर विषयावर चर्चा केली असावी असं स्पष्ट दिसत आहे. हा फोटो नेमका मुंबईतील आहे की पुण्यातील याबाबत सुप्रिया सुळे यांनी काहीही माहिती दिलेली नाही. परंतु, फॅमिली डिनर एवढंच कॅप्शन या फोटोला देण्यात आलं.