sharad pwar

मुंबई : यूपीए अध्यक्षपदासाठी शरद पवार यांची वर्णी लागू शकते या बातमीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. मात्र, राष्ट्रवादीने हे वृ्त्त  फेटाळले आहे. याबाबत राष्ट्रवादीने जाहीर स्पष्टीकरणच दिले आहे.

यूपीएच्या अध्यक्षा सोनिया (Sonia Gandhi) गांधी यांची प्रकृती ठीक नसल्याने त्या आपल्या पदाचा राजीनामा देतील, असं सांगितलं जात आहे. तसंच या अध्यक्षपदासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांची वर्णी लागू शकते या देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली.

या बातमीत तथ्य नसल्याचा खुलासा राष्ट्रवादीने केला आहे.

यूपीए मधील घटक पक्षांमध्ये अशा प्रकारचा कुठलाच प्रस्ताव नाही व कुठली चर्चा देखील झालेली नाही. जाणून-बुजून काही लोकांनी अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पेरुन केंद्र सरकारच्या चुकीच्या कृषी धोरणाच्या बाबत जो तीव्र  शेतकरी आंदोलन आहे  त्याच्यावरून  जनतेचे लक्ष  विचलित करण्याचा हा  प्रयत्न असल्याचा आरोपही राष्ट्रवादीने केला आहे.