शरद पवार करणार अन्नत्याग, कृषी विधेयक प्रकरणी राज्यसभा खासदारांना पाठिंबा

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की. खासदारांच्या निलंबनाचा निर्णय अयोग्य आहे. केवळ भूमिका मांडण्यासाठी खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच खासदरांचा विरोध करण्याचा अधिकार हिरवणे अयोग्य आहे.

दिल्ली : राज्यसभेत कृषी विधेयकावरुन (Agriculture Bill) विरोधी खासदारांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यामुळे राज्यसभेत (Rajya Sabha) मोठा गोंधळ निर्माण झाला. उपसभापतींच्या समोरील माईक तोडण्यात आला तसेच नियमावली पुस्तिका देखील आक्रमक खासदारांनी फाडली यावरुन ८ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी कृषी विधेयकावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कृषी विधेयक प्रकरणी राज्यसभा खासदारांच्या (Rajya Sabha MPs) पाठिंब्यासाठी आज दिवसभर मी देखील अन्नत्याग करणार आहे. असे त्यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की. खासदारांच्या निलंबनाचा निर्णय अयोग्य आहे. केवळ भूमिका मांडण्यासाठी खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच खासदरांचा विरोध करण्याचा अधिकार हिरवणे अयोग्य आहे. त्यामुळे खासदारांच्या आंदोलनात सहभागी होऊन मी देखील अन्नत्याग करणार आहे. असे शरद पवारांनी म्हटले आहे.

मोदी सरकारने कृषी विधेयक सादर केल्यावर सदस्यांनी गदारोळ केला. परंतु सदस्यांच्या चर्चेच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आवाजी मतदाने हे विधेयक सभागृहात घाईघाईने मंजूर करुन घेण्यात आले. या प्रकाराबद्दल विरोधकांकडून अत्यंत तीव्रपणे नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

ममु