नारायणे राणेंच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यात गदारोळ, शरद पवारांचं राणे प्रकरणावर भाष्य

नारायण राणे यांच्यावर मला जास्त काही बोलायचं नाही. ते त्यांच्या पद्धतीने चालत आहेत, कदाचित त्यांच्या संस्कारचा तो भाग असावा, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील राणेंवर उपरोधिक टीका केली आहे. शरद पवार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींकडे आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

    मुंबईः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राज्यात गदारोळाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी शिवसेना आणि राणे समर्थक आमने-सामने आले आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवारांनीही आता राणे प्रकरणावर भाष्य केलं आहे.

    कदाचित त्यांच्या संस्कारचा तो भाग

    नारायण राणे यांच्यावर मला जास्त काही बोलायचं नाही. ते त्यांच्या पद्धतीने चालत आहेत, कदाचित त्यांच्या संस्कारचा तो भाग असावा, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील राणेंवर उपरोधिक टीका केली आहे. शरद पवार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींकडे आपली प्रतिक्रिया दिली आहे.

    शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी राणेंना या विधानावरून खडे बोलही सुनावले आहेत. शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई यांनीसुद्धा राणेंच्या अॅक्शनला रिअॅक्शन देणार असल्याचं बोलून दाखवलं आहे.