शरद पवारांचे मुंबईतील निवासस्थान सिल्व्हर ओक येथे दोन सुरक्षा रक्षकांसह कर्मचारी कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे शरद पवारांनी कोरोना चाचणी केली. शरद पवारांच्या पीएंची देखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे. कोरोनाबाधित आढळलेल्या कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावरील सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यावर शरद पवारांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली होती. परंतु त्यांचा कोरोना अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. शरद पवारांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात कोरोना चाचणी केली होती. तसेच त्यांचा रिपोर्टही निगेटिव्ह आल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. 

शरद पवारांचे मुंबईतील निवासस्थान सिल्व्हर ओक येथे दोन सुरक्षा रक्षकांसह कर्मचारी कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे शरद पवारांनी कोरोना चाचणी केली. शरद पवारांच्या पीएंची देखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे. कोरोनाबाधित आढळलेल्या कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच निवासस्थान परिसरातील सर्व नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. तेथील परिसर सॅनिटाइज करण्यात येणार असल्याचे समजते आहे. 

शरद पवारांच्या सुरक्षा रक्षकांना कराड दौऱ्याच्या नंतर कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच मंत्री बाळासाहेब पाटील यांना देखील कराड दौऱ्याच्या नंतर कोरोनाची लागण झाली आहे.