कंगनाच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया…

मला असं वाटतं अशी वक्तव्यं करणाऱ्यांना आपण अधिक महत्व देत आहोत. असं वक्तव्य केल्याने जनमनासावर काय परिणाम होईल हे पहावं लागेल, पण माझ्या मते कोणी गांभीर्यानं घेत नाही. महाराष्ट्र, मुंबईच्या लोकांना या शहरातील, राज्यातील पोलिसांचा कित्येक वर्षांचा अनुभव आहे. त्यांचं कतृत्त्व त्यांनी माहिती आहे. त्यामुळे कोणी पाकिस्तानशी तुलना वैगेरे केली तर गांभीर्याने लक्ष देऊ नये, असे शरद पवारांनी म्हटलं आहे.

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटत असल्याचं म्हटलं होतं. तिच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अशी वक्तव्यं करणाऱ्यांना आपण अधिक महत्व देतोय असं मत व्यक्त केलं आहे. त्याचसोबतच शिवसेनेचे नेते विरुद्ध कंगना असा ‘पंगा’ सुरू आहे. अखेर या वादावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सेनेला सबुरीचा सल्ला दिला आहे.

मला असं वाटतं अशी वक्तव्यं करणाऱ्यांना आपण अधिक महत्व देत आहोत. असं वक्तव्य केल्याने जनमनासावर काय परिणाम होईल हे पहावं लागेल, पण माझ्या मते कोणी गांभीर्यानं घेत नाही. महाराष्ट्र, मुंबईच्या लोकांना या शहरातील, राज्यातील पोलिसांचा कित्येक वर्षांचा अनुभव आहे. त्यांचं कतृत्त्व त्यांनी माहिती आहे. त्यामुळे कोणी पाकिस्तानशी तुलना वैगेरे केली तर गांभीर्याने लक्ष देऊ नये, असे शरद पवारांनी म्हटलं आहे.

मुंबईतील लोकं आणि महाराष्ट्राची जनताही सुज्ञ आहे. जनतेवर अशा लोकांच्या वक्तव्यामुळे काही परिणाम होतो का हे पाहणे महत्त्वाचे असते. पण लोकं अशा वक्तव्य आणि लोकांना गंभीरपणे घेत नाही. त्यामुळे तुम्हीही अशा लोकांना जास्त प्रसिद्धी देऊ नका, असा सल्ला शरद पवार यांनी शिवसेनेला आणि सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे.