no instructions give notice sharad pawar election commission clears

शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांच्यात झालेल्या भेटीनंतर शिवसेना पुन्हा भाजपसोबत युती करणार का ? तसेच राज्यात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil) यांनी केलं होतं. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्त्यव्यांचं (statement ) खंडन केलं आहे. तसेच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले शरद पवार ?

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मुलखातीचा राजकीय अर्थ काढण्याचं कारण नाही. संजय राऊत यांनी माझी मुलाखत घेतली होती. त्यावेळीच त्यांनी इतर पक्षांच्या नेत्याच्या मुलाखती घेणार असं जाहीर केलं होतं. त्यामुळे त्यांच्या या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याचं कारण नाही. असे शरद पवार यांनी सांगितले आहे.

पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा मध्यावधी निवडणुकीचा दावा फेटाळून लावला. राज्यात मध्यावधीची शक्यता नाही असं ते म्हणाले आहेत.