निवडणूक लढवण्याबाबत शरद पवारांचा खुलासा! सर्व वृत्तांचा इन्कार करत आरोप फेटाळले

शरद पवार यांच्या हवाल्याने काही वृत्तवाहिन्यांनी हे वृत्त दिले होते. त्यात प्रशांत किशोर माझ्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत चर्चा केल्याचे वृत्त निराधार आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी काय गणित मांडले हे मला माहीत नाही. प्रशांत किशोर यांनी माझी भेट घेतली. मात्र, ही राजकीय भेट नव्हती. २०२४च्या निवडणुकीवर या भेटीत कोणतीही चर्चा झाली नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे.

  मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपती करण्यासाठी यूपीएमध्ये हालचाली सुरू असल्याची वृत्त आणि त्यात स्वत: राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याच्या सा-या बातम्या ‘फेक न्यूज’ ठरल्या आहेत. स्वत: शरद पवार यांनीच या वृत्तांचा इन्कार करत फेटाळून लावले आहे. ते म्हणाले की, राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही.

  निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही

  शरद पवार यांच्या हवाल्याने काही वृत्तवाहिन्यांनी हे वृत्त दिले होते. त्यात प्रशांत किशोर माझ्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत चर्चा केल्याचे वृत्त निराधार आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी काय गणित मांडले हे मला माहीत नाही. प्रशांत किशोर यांनी माझी भेट घेतली. मात्र, ही राजकीय भेट नव्हती. २०२४च्या निवडणुकीवर या भेटीत कोणतीही चर्चा झाली नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे.

  वृत्त पवारांनी फेटाळून लावले

  दरम्यान, प्रशांत किशोर यांनी काल काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार करण्याबाबत चर्चा केल्याचे या  वृत्तातून सांगण्यात येत होते. २०२२ मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर यूपीएकडून पवारांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार करण्यासाठी प्रशांत किशोर प्रयत्न करत असल्याच्या वृत्ताला पवारांनी फेटाळून लावले आहे.

  सर्वपक्षीयांचा पाठिंबा

  पवारांनी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार व्हावे म्हणून प्रशांत किशोर कामाला लागले आहेत. त्यांचे ममता बॅनर्जी, जनग रेड्डी, अरविंद केजरीवाल, एमके स्टॅलिन, उद्धव ठाकरे यांच्याशी चांगले संबंध आहेत, तसेच ओडिशाचे बीजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक यांच्याशीही या संदर्भात किशोर चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत होते. काँग्रेसच्या नेत्यांना त्यांनी यासाठी प्रेझेंटेशन दिले असे सांगण्यात येत होते मात्र पवार यानी या शक्यता फेटाळून लावल्या आहेत.