महाविकास आघाडीत गोंधळात गोंधळ! शरद पवारांनी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि…

  मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवसास्थानी सुमारे तासभर भेट घेवून चर्चा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याबाबत मार्गदर्शन केल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून नैसर्गिक संकटे सुरुच असून त्याबाबत केंद्र सरकारकडून वाढीव मदत मिळाण्यात अडचणी येत आहेत त्याबाबत पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा केली असल्याचे सांगण्यात येत आहे

  राजकीय चर्चा करण्यासाठी भेट नसल्याची माहिती

  या चर्चाचा तपशील अधिकृत पणे सांगण्यात आला नसला तरी उपमुख्यमंत्री अजीत पवार यानी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना ही भेट राजकीय चर्चा करण्यासाठी नसल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, पवार साहेबांच्या भोवती देशाचे राजकारण फिरत असते अश्या वेळी अनेकदा काही विषयांवर त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी लागते, तर त्या वेळी ते जावून चर्चा करत असतात. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे नेते म्हणून ते स्वत: वेळोवेळी काही गोष्टींचे मार्गदर्शन करत असतात असे पवार म्हणाले.

  स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबत चर्चा

  दरम्यान, राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कालच शरद पवार आणि त्यांच्या पक्षांच्या आजी माजी आमदार खासदार यांची बैठक झाली त्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यानी तीन पक्षांची एकजूट शक्य असेल तर चर्चा करावी अन्यथा आघाडीतील जे सोबत येतील त्या पक्षांना घेवून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांना सामोरे जावे अशी भुमिका घेण्यात आली. त्यानुसार पवार यानी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याबाबत आपली मते मांडल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून नैसर्गिक संकटे सुरुच असून त्याबाबत केंद्र सरकारकडून वाढीव मदत मिळाण्यात अडचणी येत आहेत त्याबाबत पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

  तिस-या लाटेला रोखण्या संदर्भात उपाययोजनांवर चर्चा

  राज्यात कोरोना निर्बंधावरून सध्या जोरदार राजकारण केले जात असून भारतीय जनता पक्षाकडून मंदीरे उघडण्याची मागणी केली जात आहे त्या बाबत राष्ट्रवादी पक्षाने यापुढच्या काळात गर्दीचे कार्यक्रम न घेण्याची भुमिका घेत मुख्यमंत्र्याच्या भुमिकेला समर्थन देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर येत्या काळात राज्यात गणेशोत्सवाच्या गर्दीला टाळून तिस-या लाटेला रोखण्या संदर्भात करायच्या उपाय योजनांची माहिती पवार यानी जाणून घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

  दोन्ही पक्षांच्या नेत्यांना संयुक्तपणे पाठबळ देण्याचा विचार

  या शिवाय राज्यात सक्त वसुली संचलनालय ईडीने राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ठराविक नेत्यांना लक्ष्य केल्याचे दिसत असून त्यांच्यावर जप्ती आणि धाडी तसेच गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जात आहे या संदर्भात दोन्ही पक्षांच्या नेत्यांना पाठबळ देण्यासाठी संयुक्तपणे काय करता येईल यावर नजिकच्या काळात चर्चा करण्याबाबत बैठक घेण्याबाबतही या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  मुख्यमंत्री सहायता निधीला दोन कोटी पेक्षा जास्त मदत

  दरम्यान, रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-१९) साठी २ कोटी ३६ लाख ८४ हजार ७५७ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी वर्षा निवासस्थान येथे सुपूर्द केला. यावेळी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेच्या राज्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांनी या निधीसाठी एक दिवसाचे वेतनाचे योगदान दिले आहे.