शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे

संभाजीराजे आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर विनायक मेटे यांनी सांगितले की, लोकशाहीत कोणीही कोणाला भेटू शकते. मात्र, शरद पवार यांचा मराठा आरक्षणाविषयीचा आजपर्यंतचा दृष्टीकोन पाहता या भेटीतून काहीही साध्य होणार नाही. ते म्हणाले की, संभाजीराजे छत्रपती हे राजे आहेत.

    मुंबई : मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांनी शरद पवार यांची भेट घेतली असली तरी त्यामधून काहीही साध्य होणार नाही, असे मत शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी व्यक्त केले आहे. शरद पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे संभाजीराजे म्हणतात मात्र, अवघ्या १० मिनिटांच्या या भेटीत मराठा आरक्षण, नोकऱ्या, सारथी या सर्व विषयांवर चर्चा कशी काय होऊ शकते, असा सवाल विनायक मेटे यांनी उपस्थित केला.

    काहीही साध्य होणार नाही
    संभाजीराजे आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर विनायक मेटे यांनी सांगितले की, लोकशाहीत कोणीही कोणाला भेटू शकते. मात्र, शरद पवार यांचा मराठा आरक्षणाविषयीचा आजपर्यंतचा दृष्टीकोन पाहता या भेटीतून काहीही साध्य होणार नाही. ते म्हणाले की, संभाजीराजे छत्रपती हे राजे आहेत. आम्ही प्रजा आहोत. ते कोणालाही भेटू शकतात. आम्ही जनतेमध्ये जाऊन जनजागृती करत आहोत. आता संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिले असते तर ही वेळच आली नसती, अशी टीका विनायक मेटे यांनी केली.