इंद्राणीचा वैद्यकीय अहवाल सादर करा; उच्च न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला निर्देश, जाणून घ्या सविस्तर

मुंबईतील उच्च्भ्रू कुटुंबातील शीना बोराच्या हत्येप्रकऱणी तिची आई इंद्राणीला ऑगस्ट २०१५ साली अटक करण्यात आली असून ती भायखळा येथील महिला कारागृहात आहे. आपली प्रकृती अस्थिर आहे. तसेच भरपूर कालावधी कारागृहातच व्यतित केल्यामुळे आपल्याला मेंदूचा विकार जडला त्यामुळे आजारपणाच्या तसेच खटल्याच्या गुणवतेच्या आधारावर आपली सुटका करण्यात यावी अशी मागणी सोमवारी न्या. प्रकाश नाईक यांच्यासमोर इंद्राणीच्या वतीने करण्यात आली.

    मुंबई :  शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्या अर्जाची दखल घेत न्यायालयाने कारागृह प्रशासनाला इंद्राणीचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

    मुंबईतील उच्च्भ्रू कुटुंबातील शीना बोराच्या हत्येप्रकऱणी तिची आई इंद्राणीला ऑगस्ट २०१५ साली अटक करण्यात आली असून ती भायखळा येथील महिला कारागृहात आहे. आपली प्रकृती अस्थिर आहे. तसेच भरपूर कालावधी कारागृहातच व्यतित केल्यामुळे आपल्याला मेंदूचा विकार जडला त्यामुळे आजारपणाच्या तसेच खटल्याच्या गुणवतेच्या आधारावर आपली सुटका करण्यात यावी अशी मागणी सोमवारी न्या. प्रकाश नाईक यांच्यासमोर इंद्राणीच्या वतीने करण्यात आली. त्याची दखल घेत कारागृह प्रशासनाला इंद्राणीचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश देत न्यायालयाने सुनावणी ३ मेपर्यंत तहकूब केली.

    इंद्राणी मुखर्जीने याआधीही अनेकवेळा जामीनसाठी अर्ज दाखल केला आहे. कोरोनाच्या कारणाखाली इंद्राणीने अंतरिम जामिनासाठी सीबीआय विशेष न्यायालयात जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, प्रत्येकवेळेस प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर आता इंद्राणीने उच्च न्यायालयात नव्याने अर्ज दाखल आहे. २४ एप्रिल २०१२ मध्ये शीना बोराची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर इंद्राणीला २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती. इंद्राणीचा चालक शामवर रायला हत्यारे बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. इंद्राणीवर पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि श्मावर राय यांच्यासोबत मिळून आपल्या पहिल्या पतीची मुलगी शीनाची हत्या केली आणि २५ एप्रिल रोजी तिच्या मृतदेहाची विल्टेवाट लावण्यात आल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.