ram kadam

आमदार राम कदम यांचा मतदार संघ असलेल्या घाटकोपर मध्ये देखील शिवसेनेने तीव्र आंदोलन केले.या वेळी आमदार राम कदम यांच्या प्रतिमेला शिवसैनिकांनी जोडे मारो आंदोलन केले.तसेच राम कदम आणि भाजप च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

मुंबई: पवई पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक नितीन खैरमोडे यांच्यावर काल भाजप कार्यकर्ते दिपू तिवारी, सचिन तिवारी, आयुष राजभर यांनी हल्ला केला होता.त्या भाजपा कार्यकर्त्यांना सोडण्यासाठी पोलिसांना भाजपा आमदार राम कदम यांनी फोन केला होता.याच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे.


आज मुंबईत ठीक ठिकाणी शिवसेनेतर्फे आमदार राम कदम आणि भाजप विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. आमदार राम कदम यांचा मतदार संघ असलेल्या घाटकोपर मध्ये देखील शिवसेनेने तीव्र आंदोलन केले.या वेळी आमदार राम कदम यांच्या प्रतिमेला शिवसैनिकांनी जोडे मारो आंदोलन केले.तसेच राम कदम आणि भाजप च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मुख्य आरोपी दिपू तिवारीला लवकरात लवकर अटक करा आणि राम कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी या वेळी शिवसेनेने केली यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.