Shiv Sena, a huge blow to the NCP; Ganesh Naik succeeds in increasing BJP's incoming

नवी मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस या दोन पक्षांना रविवारी जबरदस्त धक्का बसला. राष्ट्रवादीत असलेल्या एका माजी नगरसेवकासह दिघा आणि कोपरखैरणेतील या पक्षांच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार गणेश नाईक यांनी या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले.

नवी मुंबई : नवी मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस या दोन पक्षांना रविवारी जबरदस्त धक्का बसला. राष्ट्रवादीत असलेल्या एका माजी नगरसेवकासह दिघा आणि कोपरखैरणेतील या पक्षांच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार गणेश नाईक यांनी या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले.

गुंडशाही आणि बळाचा वापर करून भाजपच्या कार्यकर्त्यांना धमकावून त्रास देण्याचे प्रकार विरोधकांकडून सुरू झाले आहेत. त्यावर चिंता करू नका, असा दिलासा देत आमदार गणेश नाईक यांनी आपण कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे या वेळी मार्गदर्शन करताना सांगितले. सुजाण जनता अपप्रवृत्तींचा निश्चितच विनाश करणार आहे. समाज चांगल्या गोष्टीची किंमत करणारा आहे, असे नमूद करून नवी मुंबई महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला.

दिघा विभागात प्रभाग क्रमांक चारमधून माजी नगरसेवक मुकेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली माया गायकवाड, संजय गायकवाड, ध्रुवपद फुलपागर, संजय जावळे, रामप्रवेश यादव, शिरीष गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रभाग क्रमांक पाचमधून भाजपचे दिघा मंडळ अध्यक्ष त्रिभुवन सिंह ठाकुर, युवा नेते दीपक उपाध्याय, युवा अध्यक्ष राम उपाध्याय, दिघा मंडल उपाध्यक्ष वीरू पांडे, समाजसेविका संतोषी उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली इलठण पाडा-कन्हैया नगर परिसरातील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी ममता गुप्ता, निर्मला पाल, गुलाबी यादव, प्रभादेवी लीला यादव, उषा यादव, सिताराम भारद्वाज, विजय यादव, जुबेर शेख, निलेश उपाध्याय तसेच इतर कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

कोपरखैरणे प्रभाग ४६ परिसरातही शिवसेनेला भगदाड पडले आहे. माजी नगरसेवक शंकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे प्रभाग क्रमांक ४६ चे शाखाप्रमुख किशोर मोरे यांच्यासमवेत संजय चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी माजी आमदार संदीप नाईक, भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, भाजपाचे मुंबई जिल्हा सचिव विकास झंजाड, माजी नगरसेवक रामआशिष यादव, माजी नगरसेवक अशोक पाटील, माजी नगरसेवक शंकर मोरे, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील, माजी नगरसेविका अॅड. भारती पाटील, माजी नगरसेविका शुभांगी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.