eknath shinde

गृहमंत्रीपद राष्टवादीच्या खात्यात गेले. देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद सध्या उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे. त्यामुळे हे पद शिवसेनेला मिळावे, यासाठी पुन्हा एकदा लॉबिंग सुरू झाले आहे. एकंदरीत, गृहमंत्रिपदावरून राज्यात पुन्हा ‘गृह’कलह उफाळून येण्याची चिन्हे आहे.

    मुंबई : गृहमंत्रिपदासाठी एकीकडे राष्ट्रवादीत चाचपणी सुरू असतानाच शिवसेनेलाही गृहमंत्रीपद हवे असल्याची चर्चा राज्यात सुरू झाली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेवेळी शिवसेनेने गृहमंत्रीपदावर दावा केला होता. त्यासाठी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे नावही चर्चेत होते.

    मात्र, हे पद राष्टवादीच्या खात्यात गेले. देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद सध्या उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे. त्यामुळे हे पद शिवसेनेला मिळावे, यासाठी पुन्हा एकदा लॉबिंग सुरू झाले आहे. एकंदरीत, गृहमंत्रिपदावरून राज्यात पुन्हा ‘गृह’कलह उफाळून येण्याची चिन्हे आहे.

    अँटेलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याकांड यानंतर पोलिस अधिकारी सचिन वाझेंची अटक यामुळे राज्याचे वाताराण चांगलेच तापले. त्यातच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या ‘लेटर बॉम्ब’मुळे चांगलीच खळबळ उडाली. विरोधककांकडून अनिल गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. अखेर देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

    गृहमंत्र्यांनी सचिन वाझेला महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. तसेच पत्रच त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली तसेच अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली.

    या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानंतर अनिल देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.