राजकीय वर्तुळात खळबळ, मध्यरात्री शिवसेना आणि मनसेत झालं गुफ्तगू

मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) आणि शिवसेना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्यात गुप्त बैठक झाली. कोरोनाच्या काळात अनेक मागण्यांसाठी मनसेनं आक्रमक पवित्रा घेतल्याचं आपण सगळ्यांनीच पाहिलं आहे. यावेळी वारंवार शिवसेनेवर आणि ठाकरे सरकारवर मनसेकडून निशाणा साधण्यात आला. पण आता रात्री झालेल्या या बैठकीमुळे राजकीय चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे नेमकं या बैठकीत काय झालं. हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.

 मुंबई : मनसे (MNS) आणि शिवसेना (SHIV SENA) यांच्यात मध्यरात्री दरम्यान बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) आणि शिवसेना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्यात गुप्त बैठक झाली. कोरोनाच्या काळात अनेक मागण्यांसाठी मनसेनं आक्रमक पवित्रा घेतल्याचं आपण सगळ्यांनीच पाहिलं आहे. यावेळी वारंवार शिवसेनेवर आणि ठाकरे सरकारवर मनसेकडून निशाणा साधण्यात आला. पण आता रात्री झालेल्या या बैठकीमुळे राजकीय चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे नेमकं या बैठकीत काय झालं. हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळा नांदगावकर आणि शिवसेना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यात रब्बरवाला हाऊस येथे ही बैठक पार पडली. तर या बैठकीत नेमकं काय झालं याचे आता तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. परंतु या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

शनिवारीच मनसेच्या महिला सेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारला वाढीव वीजबिलावरोधात निवेदन दिलं होतं. मनसेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री सचिवालय, नवी मुंबईतील कोकण भवन यांना निवेदन देण्यात आलं होतं. या निवेदनात मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी राज्य सरकारला १५ दिवसांचा अवधी दिला आहे. लोकल सुरू करण्याच्या मागणीसाठीही सत्ताधारी शिवसेना आणि मनसेत जुंपली होती.