Let's overcome corona and build health; Happy New Year to Chief Minister Uddhav Thackeray

भाजपा जिल्हा महामंत्री बाबा राम शब्द यादव याने जनसुनवाई या उत्तर प्रदेश सरकारच्या पोर्टलवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाबाबत खटला दाखल करण्याची मागणी केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, ‘ मई 2018 में पालघर में चुनाव प्रचार के दौरान महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने यूपी के सीएम योगी आदित्यनाथ पर अशोभनीय भाषा का प्रयोग करते हुए चप्पल से मारने की बात कही थी’

  आंबेडकर :  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी भाजप नेते आणि गृहमंत्री अमीत शहा यांनी दूरध्वनी वरून चर्चा केल्यानंतर काही तासांत उत्तर प्रदेशातील भाजपा जिल्हा महामंत्री बाबा राम शब्द यादव यांनी मुख्यमंत्री योगी यांच्याबाबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी तीन वर्षापूर्वी व्यक्त केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांबाबत ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि भाजप यांच्यातील अटक नाटक चा नवा राजकीय अंक सुरू होण्याची शक्यता आहे. या तक्रारदाराने राज्यातील नेत्यांच्या सांगण्यावरून तक्रार दाखल केली असल्याचे म्हटले आहे.

  गुन्हा नोंदवा नाहीतर न्यायालयात जावू

  भाजपा जिल्हा महामंत्री बाबा राम शब्द यादव याने जनसुनवाई या उत्तर प्रदेश सरकारच्या पोर्टलवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाबाबत खटला दाखल करण्याची मागणी केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, ‘ मई 2018 में पालघर में चुनाव प्रचार के दौरान महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने यूपी के सीएम योगी आदित्यनाथ पर अशोभनीय भाषा का प्रयोग करते हुए चप्पल से मारने की बात कही थी’ यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत आणि सरकारने तातडीने गुन्हा नोंदवून घेतला नाहीतर आपण न्यायालयात जावू असे यादव यानी म्हटले आहे.

  चपलेने तोंड फोडण्याची भाषा

  माध्यमांशी बोलताना यादव यानी आपण प्रदेश नेत्यांच्या सूचनेवरून ही तक्रार देत असल्याचे म्हटले आहे. २०१८मध्ये योगी आदित्यनाथ मुंबईत आले असता त्यानी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार घालताना पायातील चपला बाजुला काढल्या नव्हत्या. त्यावर पालघरच्या सभेत उध्दव ठाकरे यानी समाचार घेताना त्याच चपलेने तोंड फोडण्याची भाषा केली होती. त्यामुळे भाजप शिवसेनेतील हे राजकीय भांडण उत्तरप्रदेश आणि मुंबईतील निवडणुकांसाठी कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]