शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांना कोरोनाची लागण ; उद्धव ठाकरेंनी रद्द केली बैठक

राज्यात कोरोना विषाणूचा (Corona virus) प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. परंतु शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांना कोरोनाची लागण (Shiv Sena cabinet ministers infected with corona) झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना कोरोनाची लक्षणं जाणवू लागली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने लिलावती हॉस्पिटलमध्ये (Lilavati Hospital) दाखल करण्यात आले आहे

 मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा (Corona virus) प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. परंतु शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांना कोरोनाची लागण (Shiv Sena cabinet ministers infected with corona) झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना कोरोनाची लक्षणं जाणवू लागली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने लिलावती हॉस्पिटलमध्ये (Lilavati Hospital) दाखल करण्यात आले आहे.आतापर्यंत जवळपास नऊ मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये राष्ट्रवादीचे तीन, कॉंग्रेसचे तीन, शिवसेनेचे दोन आणि एक अपक्ष मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे.

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण झाल्याची भीती वर्तवली जात आहे. आज सकाळी त्यांना कोरोनाची लक्षण जाणवू लागली आहे. कोरोनाच्या परिस्थितीत अनिल परब यांनी संपूर्ण खबरदारी घेत आपले कार्य नियम पार पाडत होते. याच भेटीगाठी दरम्यान, त्यांना कोरोनाची लागण झाली असावी. त्यामुळे आपल्या संपर्कात आलेल्या कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन परब यांनी केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी सर्व आमदारांची आज शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली होती. मात्र, अनिल परब यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, असल्याची बातमी आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ही बैठक रद्द केली आहे.