MNS also opposes naming Navi Mumbai airport after Balasaheb Thackeray

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आज करण्यात आलेल्या आंदोलना नंतर राज्य सरकारने मोठा खुलासा केला आहे. नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पूर्वीच सिडकोने मंजूर केला आहे, अशी माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

  मुंबई : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आज करण्यात आलेल्या आंदोलना नंतर राज्य सरकारने मोठा खुलासा केला आहे. नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पूर्वीच सिडकोने मंजूर केला आहे, अशी माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

  अन्य प्रकल्पाला दि. बा. पाटील यांचे नाव

  मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना नगरविकास मंत्र्यानी ही माहिती दिली. ते म्हणाले की, नवी मुंबई विमानतळाला नाव देण्याचा कोणताही प्रस्ताव आधी आला नव्हता. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सिडकोने मंजूर केला आहे.  मात्र आम्हाला दि. बा. पाटील यांच्याबद्दल आदर आहे. त्यामुळे नवी मुंबईतील अन्य नव्या मोठ्या प्रकल्पाला दि. बा. पाटील यांचे नाव प्रकल्पग्रस्त कृती समितीने सूचवावे, असे आवाहनही शिंदे यांनी केले.

  शरद पवार आमचे मार्गदर्शक

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले होते. या भेटीची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच्या राज्य मंत्रिमंडळातील बैठकीत दिली आहे, असेही शिंदे यांनी सांगितले. शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यावर बोलताना शिंदे म्हणाले की, शिवसेना हा नेहमीच विश्वासार्ह पक्ष राहिला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेला हा आदर्श आहे. ते म्हणाले की शरद पवार हे आमचे मार्गदर्शक आहेत.

  हे सुद्धा वाचा