Balasaheb Thackeray's birthday and Narayan Rane's tweet ... shared an old photo with Balasaheb

राणे यांना शिवसेनेचे रिमोट कंट्रोल सीएम म्हटले जात होते. त्यावेळी खरे सूत्र उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात असल्याचे बोलले जात होते. यानंतर भाजप-शिवसेना युती निवडणूक हरली आणि राणे विरोधी पक्षनेते झाले. 2005 मध्ये राणे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी 'शिवसेनेत नेता काढून टाकण्याचा आणि निवडण्याचा अधिकार मला आहे,' असं म्हणत पक्षातून काढून टाकले.

    मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे मोदी मंत्रिमंडळात दाखल झाले आहेत. शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात करणारे राणे हे कॉंग्रेस पक्षात देखील बराच काळ राहिले आहेत. 2018 मध्ये त्यांनी कॉंग्रेसचा हात सोडला. एकेकाळी राणे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अगदी जवळचे मानले जात होते. राणे काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी शिवसेनेत होते.

    राणे यांना शिवसेनेचे रिमोट कंट्रोल सीएम म्हटले जात होते. त्यावेळी खरे सूत्र उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात असल्याचे बोलले जात होते. यानंतर भाजप-शिवसेना युती निवडणूक हरली आणि राणे विरोधी पक्षनेते झाले. 2005 मध्ये राणे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी ‘शिवसेनेत नेता काढून टाकण्याचा आणि निवडण्याचा अधिकार मला आहे,’ असं म्हणत पक्षातून काढून टाकले.

    1968 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. 1985 ते 1990 दरम्यान ते शिवसेनेचे नगरसेवक बनले यानंतर, ते मुंबई महापालिका परिवहनचे (BEST) अध्यक्ष बनले. 1996-99 मध्ये शिवसेना-भाजप सत्तेत ते महसूलमंत्री झाले. 1999 मध्ये त्यांनी 9 महिने मुख्यमंत्री भूषवले.
    2005 मध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत मतभेदानंतर 3 जुलै 2005 रोजी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर ते काँग्रेसमध्ये महसूलमंत्री झाले. 2007 मध्ये काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना टक्कर दिली. 2009 मध्ये महाराष्ट्राचे उद्योग मंत्री बनले. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीच मुलगा नीलेशच्या पराभवानंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. 2017 मध्ये काँग्रेसचा हात सोडून आपला स्वतःचा पक्ष स्थापन केला. यानंतर 2019 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यानंतर दोन वर्षात त्यांना भाजपमध्ये मंत्रीपद मिळाले.