विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केलाय. यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. “उर्मिला मातोंडकर यांच्या प्रवेशाने महिला आघाडी मजबूत होईल असं म्हणणं म्हणजे आदरणीय बाळासाहेबांनी रणरागिणी म्हणून शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांना उपमा दिली त्यांच्या कामावर पाणी फेरण्यासारखं आहे असे प्रवीण दरेकर म्हणाले.

मुंबई (Mumbai).  अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केलाय. यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. “उर्मिला मातोंडकर यांच्या प्रवेशाने महिला आघाडी मजबूत होईल असं म्हणणं म्हणजे आदरणीय बाळासाहेबांनी रणरागिणी म्हणून शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांना उपमा दिली त्यांच्या कामावर पाणी फेरण्यासारखं आहे असे प्रवीण दरेकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “ज्या शिवसेनेच्या महिला आघाडीने शिवसेनेचं जीवापाड काम करतायत, जसं की, मीना कांबळी, उमेशा पवार, सुधाताई चुरी यांनी शिवसेनेसाठी रस्त्यावर उतरून काम केलं. त्यांचा शिवसेनाप्रमुखांनी सन्मान केला होता. मात्र आता उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेत प्रवेश देऊन या शिवसेनेच्या महिला आघाडी कार्यकर्त्यांचे शिवसेनेने एका अर्थाने अवमूल्यन केले आहे,” असं वक्तव्य दरेकर यांनी केले.