शिवसेनेला मिळाले निवडणूक चिन्ह ‘बिस्किट’
शिवसेनेला मिळाले निवडणूक चिन्ह ‘बिस्किट’

मुंबई (Mumbai) : बिहार विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावणाऱ्या शिवसेना पक्षाला निवडणूक आयोगाने बिहारसाठी बिस्किट हे निवडणूक चिन्ह दिले आहे. ज्यावर शिवसेनेने आक्षेप नोंदवला आहे.

  • निवडणूक चिन्हावर शिवसेना नाराज

मुंबई (Mumbai) : बिहार विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावणाऱ्या शिवसेना पक्षाला निवडणूक आयोगाने बिहारसाठी बिस्किट हे निवडणूक चिन्ह दिले आहे. ज्यावर शिवसेनेने आक्षेप नोंदवला आहे. बिहारमधील सत्ताधारी संयुक्त् जनता दल आणि शिवसेनेचे निवडणूक चिन्ह हे सारखे असल्याने जेडीयूने शिवसेनेच्या चिन्हाला आक्षेप घेतला होता. यानंतर शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चा या दोन्ही पक्षांची निवडमूक चिन्हे परत घेण्यात आली होती.

शिवसेना आणि झामुमो या दोन्ही पक्षांच्या चिन्ह्यांत धनुष्य आहे, तर जेडीयूच्या चिन्हात बाण आहे. बिहार निवडणुकीत शिवसेना ५० उमेदवार रिंगणात उभे करीत आहे. शिवसेनेने धनुष्य-बाणाऐवजी ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, गॅस सिलिंडर किंवा बॅट या चिन्हांची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र ही तिन्ही चिन्हे न देता आयोगाने बिस्किट हे चिन्ह शिवसेनेला दिले आहे. यानंतर शिवसेनेने या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवला आहे.