“शिवसेना हिंदुत्वाला विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि एमआयएम पक्षाच्याही पुढे गेली; भाजपच्या ”या” नेत्याची टीका

शिवसेनेने अग्रलेखाच्या माध्यमातून सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना हिंदुत्वाला विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि एमआयएम पक्षाच्याही पुढे गेली, अशी टीका माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.

  मुंबई : अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून यावरून विरोधी पक्षांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने जमीन खरेदी करताना घोटाळा झाल्याचा आरोप आपचे खासदार संजय सिंह आणि समाजवादी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी केला आहे.

  याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने अग्रलेखाच्या माध्यमातून सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना हिंदुत्वाला विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि एमआयएम पक्षाच्याही पुढे गेली, अशी टीका माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.

  गिरीश महाजन काय म्हणाले ?

  हिंदूंचे आराध्य दैवत श्री रामाविषयी शिवसेना वाट्टेल ते तोंडसुख घेत आहे, शिवसेनेला सर्व विषय माहीत असतानाही शिवसेना असं करत आहे. हे दुर्दैवी आहे. शिवसेना मूळ तत्वापासून भरकटली आहे, असा आरोप माजी मंत्री गिरीष महाजन यांनी केला आहे.

  अयोध्या हा इतरांसाठी राजकारणाचा भाग असला तरी आमच्यासाठी तो श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे. अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टच्या घोटाळ्यामुळे देशभरातील हिंदू भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहोचली आहे. या सगळ्यावर सरसंघचालक मोहन भागवत, विश्व हिंदू परिषद आणि ट्रस्टच्या प्रमुखांनी समोर येऊन खुलासा केला पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलं होत.

  दरम्यान, दोन कोटी रुपयाची जमीन अवघ्या काही मिनिटांतच 18.5 कोटींची कशी झाली?, भाजप आणि संघानं मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या नावावर सर्व मर्यादा सोडून चंदा गोळा करण्याचा धंदा चालवलेला आहे, असा आरोप सचिन सावंत यांनी केला होता.