नारायण राणे यांच्याविरोधात शिवसेना आक्रमक, कुठ जाळपोळ तर कुठं तोडफोड, पाहा कोणत्या जिल्ह्यांत झालं आंदोलन?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याच्या घटनेचा कोपरगाव येथे कोपरगाव शिवसेनेच्या वतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करत शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली असून राज्यातील काही ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. पाहा कोणत्या जिल्ह्यांत झालं आंदोलन?

  नारायण राणे यांच्यावर महाडमध्ये गुन्हा दाखल

  मी असतो तर मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली चढवली असती, महाड येथील पत्रकार परिषदेत राणे यांनी मुख्यमंत्री व राज्यसरकारवर सडकून टीका केली. आक्षेपार्ह विधाने नारायण राणेंना चांगलेच भोवण्याची शक्यता आहे, मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावरील टिकेनंतर शिवसेना आक्रमक झाली आहे.या प्रकारानंतर शिवसेनेने महाड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. युवा सेना अधिकारी सिद्धेश पाटकर यांच्या फिर्यादी नंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

  शिवसेना व राणे यांच्यात संघर्ष पेटला आहे, हे प्रकरण अधिक चीघळण्याची शक्यता असून राज्यभर याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. नारायण राणेंच्या वक्तव्याचा शिवसेनेने निषेध दर्शविला आहे, मुख्यमंत्र्यांच्या नादाला पुन्हा लागू नका असा इशारा महाड व पोलादपूर चे आमदार भरत गोगावले यांनी दिलाय.

  औरंगाबाद शहरामध्ये शिवसेनेतर्फे केले मूर्गी ( कोंबडी ) छोडो आंदोलन

  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली लावेल असे बेताल वक्तव्य केले त्याच्या निषेधार्थ औरंगाबाद चे आमदार अंबादास दानवे यांनी या घटनेचा वक्तव्याचा निषेध करत क्रांती चौक येथे मुर्गी छोडो आंदोलन करण्यात आले यावेळी त्यांना विचारले असता ते म्हणाले आम्ही आज मुर्गी सोडली नारायण राणे ती चोरुन नेणार असे या वेळी आ. अंबादास दानवे हे म्हणाले. नारायण राणे यांच्या विरोधात क्रांतीचौक पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असेही ते म्हणाले.

  शिवसेना विरुद्ध नारायण राणे वाद चिघळण्यास सुरुवात

  नाशिकमध्ये आता शिवसेना आणि राणे हा वाद आणखीनच चीघळल्याचे चित्र आहे,नाशिकमध्ये युवा सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पटेल रोड येथील भाजपच्या वसंत स्मृती या कार्यालयाची तोडफोड केली आहे.

  सांगलीत संतप्त शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पोस्टवर शाही फेकली होती ते पोस्टर आता पोलीस बंदोबस्तामध्ये उतरविण्यात आले आहे.या वेळी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

  अमरावती शिवसेनेने पेटवले भाजप कार्यालय

  नारायण राणे यांच्या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत असताना अमरावतीमध्ये शिवसेना महानगर च्या कार्यकर्त्यांनी अमरावती येथील भाजपचे विभागीय कार्यालय जाळले .महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात भाजप चे मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत शिवसेना अमरावती महानगर प्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वात अमरावती भाजपचे कार्यालय शिवसेना स्टाईलने पेटवून फोडण्यात आले.

  नारायण राणे यांच्या वादग्रस्त विधानाचे संगमनेरमधे पडसाद

  संगणमेर तालुक्यात व संगमनेर शहरामध्ये आज नारायण राणे यांच्या वादग्रस्त विधानाचे पडसाद संगमनेर शहरात बघायला मिळाले संगणमेर तालुका व संगमनेर शहराच्या वतीने बस स्टँड चौकात आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व संगमनेर शहर प्रमुख अमर कतारी शिवसेना ,संपर्कप्रमुख विदर्भ गोंदिया-भंडारा नरेश माळवे ,कामगार सेना जिल्हाप्रमुख अहमदनगर मुजीब शेख , शितल हासे तालुकाप्रमुख महिला आघाडी, प्रथमेश , अमोल कावडे ,अमित , अशोक तांबोळी ,रविंद्र कानकाटे ,अमोल कवडे ,आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा कोपरगाव शिवसेनेच्या वतीने निषेध

  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याच्या घटनेचा कोपरगाव येथे कोपरगाव शिवसेनेच्या वतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करत शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

  यावेळी जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, शहरप्रमुख कलविंदर डडियाल, बाळासाहेब जाधव, अस्लम शेख, ,नगरसेविका सपना मोरे,विमल पुंडे , सुलतान पठाण, रफिक शेख, राहुल देशपांडे , भुषण पाटणकर ,आकाश कानडे, अमजद शेख, बाळासाहेब साळुंके आदिंसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  रायगडात नारायण राणे यांच्याविरोधात शिवसेनेचा उद्रेक

  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात राज्यातील वातावरण चांगलंच तापलय. जन आशीर्वाद यात्रेदरम्यान महाड येथील पत्रकार परिषदेत सोमवारी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री व राज्यसरकार यांच्यावर सडकून टिका केली होती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका शिवसैनिकांच्या जिव्हारी लागली असून राज्यभरात राणे यांचा निषेध होतोय, शिवसैनिक आक्रमक झाले असून रस्त्यावर उतरून राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करतायेत.

  केंद्रीय मंत्री राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी अहमदनगर येथे शिवसैनिक आक्रमक; नारायण राणे यांच्या प्रतिमेचे केले दहन

  अहमदनगर –  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचे निर्देश पोलिसांना देण्यात आले, यावरून राज्यभर राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात अनेक जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  नारायण राणेंच्या वक्तव्याविरोधात शिवसेनेचे आंदोलन ; एन्काऊंटर करण्याचा संतोष ढवळे यांचा इशारा

  यवतमाळ : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या बेताल वक्तव्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहे. यवतमाळ येथील दत्त चौकात रस्त्यावर उतरून शिवसैनिकानी आंदोलन केले. शिवसेना प्रमुख, मातोश्री विरोधात कोणत्याही प्रकारचे वक्तव्य खपवून घेणार नाही. पापाचा घडा भरला आहे. मिळेल तिथे शिवसैनिक एन्काऊंटर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी दिला.

  रत्नागिरी शहरात शिवसैनिक आक्रमक, आमदार राजन साळवी कार्यकर्त्यांसह आक्रमक

  कालच्या नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील व्यक्तव्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिक पेटले असताना.याचा पडसाद रत्नागिरीत देखील पाहायला मिळाले आहेत.लांजा राजापूर विधानसभेचे आक्रमक आमदार राजन साळवी यांनी स्वतः आपल्या कार्यकर्त्यांसह उतरत शहरात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या स्वागता साठी लावलेले बॅनर फाडले व नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.यावेळी आमदार राजन साळवी यांनी स्वतः पुढाकार घेत नारायण राणे यांच्या व्यक्तव्याचा निषेध केला.