विमानतळाची घोषणा त्यांनी केली, एक वीट तरी लागली का? शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांची राणेंवर खोचक टीका

लोकांना दाखवण्यासाठी काम करायचं नसते. विमानतळाची घोषणा त्यांनी केली, एक वीट तरी लागली का? त्याच्या सगळ्या अडचणी दूर करून उभारणीचं काम आम्ही पूर्ण केलं आहे, असा निशाणा केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राणेंवर (Narayan Rane) साधला आहे.

मुंबई : भाजपाचे राज्यसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्यावर होत असलेल्या टीकेला शिवसेनेकडून (Shiv Sena) प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. राणेंची मूळातच दृष्टी इतकी कलुषित आहे. राजकीय प्रगल्भता त्यांच्यामध्ये अजिबातच नाही. त्यामुळे अशी फालतू टिप्पणी ते करू शकतात. विमानतळाची घोषणा त्यांनी केली, एक वीट तरी लागली का? त्याच्या सगळ्या अडचणी दूर करून उभारणीचं काम आम्ही पूर्ण केलं आहे, असं म्हणत दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राणेंवर खोचक टीका (Criticize) केली आहे.

उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व संयमी आहे. राणेंनी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या ज्या योजना त्यांनी जाहीर केल्या, एकही योजना ते पूर्ण करू शकले नाहीत. प्रत्येक योजना पाच वर्षात मी पूर्ण केली आहे. पाटबंधारे विभागाचे पाच मोठे प्रकल्प त्यांनी जाहीर केले होते. एका रुपयाचं काम झालेलं नव्हतं. सगळे प्रकल्प आज पूर्ण झालेले आहेत. लोकांना दाखवण्यासाठी काम करायचं नसते. विमानतळाची घोषणा त्यांनी केली, एक वीट तरी लागली का? त्याच्या सगळ्या अडचणी दूर करून उभारणीचं काम आम्ही पूर्ण केलं आहे, असा निशाणा केसरकर यांनी राणेंवर साधला आहे.

आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या तुलनेत तुम्ही टिकू शकत नाही. तुम्ही स्वतः मुख्यमंत्री असताना ८० जिल्ह्यासाठी आणायचे, मी साधा राज्यमंत्री असताना २५० कोटी रुपये आणायचो. कुठे आहे तुमची शक्ती? केवळ माध्यमांना मुलाखती द्यायच्या, आपण मोठे आहोत, आपण विकासकामे केली असं भासवायचं. त्या काळामध्ये जे रस्ते झाले, ते सुद्धा सुरेश प्रभूंनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून आणलेले होते. स्वतःचं मेडिकल कॉलेज सुरू केलं. शासकीय मेडिकल कॉलेज का आणू शकला नाहीत. याचं उत्तर तुम्ही जनतेला दिलं पाहिजे. कशाला महाराष्ट्राचं नेतृत्व करायच्या गोष्टी करता? सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नेतृत्व तुम्ही करू शकला नाहीत, अशी टीका केसरकर यांनी केली.