Would have stopped if there had been participation? Pradip Sharma's claim in court

पोलिस दलातील निवृत्तीनंतर शिवसेनेत प्रवेश करुन नालासोपारा मतदारसंघातून विधानसभेची 2019ची निवडणूक लढवलेल्या प्रदीप शर्मा  या वादग्रस्त ‘एन्काऊण्टर स्पेशलिस्ट’च्या हातात आज पुन्हा बेड्या पडून त्याला दुसऱ्यांदा गजाआड जावे लागले आहे. त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणात अटक केली आहे़ या प्रकरणातील ही आठवी अटक असून शर्मा यांची अटक ही सत्ताधारी शिवसेनेला मोठा धक्का देणारी असून ‘मास्टरमाईंड’ जेरबंद केल्याने एनआयएची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

  मुंबई : पोलिस दलातील निवृत्तीनंतर शिवसेनेत प्रवेश करुन नालासोपारा मतदारसंघातून विधानसभेची 2019ची निवडणूक लढवलेल्या प्रदीप शर्मा  या वादग्रस्त ‘एन्काऊण्टर स्पेशलिस्ट’च्या हातात आज पुन्हा बेड्या पडून त्याला दुसऱ्यांदा गजाआड जावे लागले आहे. त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणात अटक केली आहे़ या प्रकरणातील ही आठवी अटक असून शर्मा यांची अटक ही सत्ताधारी शिवसेनेला मोठा धक्का देणारी असून ‘मास्टरमाईंड’ जेरबंद केल्याने एनआयएची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

  घरावरही छापा

  गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून शर्मा याच्या अंधेरीच्या जे बी नगर येथील घरी एनआयएने छापेमारी करुन चौकशी सुरू केली होती़ शर्मा याच्या घरातून एनआयएने हिरेन हत्या व अँटिलिया स्फोटक प्रकरणी महत्वाचे पुरावे ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. या पुराव्यांमध्ये काही इलक्ट्रॉनिक वस्तू, सॉफ्टवेअर, कागद पत्रे आणि शर्मा सध्या वापरत असलेला मोबाइल याचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तब्बल आठ तासांहून अधिक वेळ हे सर्च आँपरेशन अधिकारी विक्रम खलाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होते.

  रिव्हॉल्व्हर जप्त

  दोन दिवसांपूर्वीच एनआयएने या प्रकरणात दोघांना अटक केली होती. एका आरोपीला लातूरमधून अटक केली होती. त्यानंतर आता थेट शर्माच्या घरी छापेमारी करण्यात आली़ निवृत्त असूनही प्रदीप शर्मा यांच्याकडे सचिन वाझेप्रमाणेच एक रिव्हॉल्वर सापडली. त्या रिव्हॉल्वरच्या परवान्याची मुदत संपलेली आहे़

  28 जूनपर्यंत कोठडी

  दुपारी प्रदीप शर्माला अटक झाल्यानंतर त्याआधी अटक करण्यात आलेल्या संतोष शेलार आणि मनिष या दोघांसोबत एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले़ त्या तिघांनाही 28 जूनपर्यंत एनआयएची कोठडी देण्यात आली. हे तिघेही हिरेनच्या हत्येत प्रत्यक्ष सहभागी असल्याचा दावा एनआयएने कोर्टात केला आहे.

  पुरावे नष्ट केल्याचा संशय

  टवेरा गाडीत मनसुखची हत्या झाल्याचा संशय एनआयएला आहे. त्या गाडीत शेलार आणि जाधव हे दोघे होते. वाझेसोबत शर्माचाही दोन्ही गुन्ह्यात सहभाग होता. सतीष, मनीष, रियाज, संतोष, आनंद, वाझे यांचा हत्येत सहभाग होता. सतीश आणि मनीष हे घटनास्थळी हजर होते. हिरेन याच्या हत्येनंतर वाझे आणि प्रदीप शर्मा यांनी कट रचून पुरावे नष्ट केले. सर्व आरोपी वाझे आणि शर्माच्या संपर्कात होते. आरोपींकडून मोठ्या प्रमाणात पैसेही जप्त केले आहेत.

  आतापर्यंत अटक झालेले आरोपी

  1. सचिन वाझे
  2. विनायक शिंदे
  3. रियाझ काझी
  4. सुनील माने
  5. नरेश गोर
  6. संतोष शेलार
  7. आनंद जाधव
  8. प्रदीप शर्मा

  हे सुद्धा वाचा