शिवसेनेचा माणुस; कोण आहे प्रदीप शर्मा ?

एन्काउंटर स्पेशलिस्ट अशी ख्याती असलेले मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) गुरुवारी अटक केली. प्रदीप शर्मा यांची याआधीही एनआयएनं सविस्तर चौकशी केली होती. सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर ७ आणि ८ एप्रिल रोजी एनआयएनं प्रदीप शर्मा यांची दीर्घकाळ चौकशी केली. यावेळी त्यांनी शर्मा यांचे जुने सहकारी सचिन वाझे यांना देखील त्यांच्यासमोर आणून चौकशी केल्याचं सांगितलं गेलं.

  मुंबई : एन्काउंटर स्पेशलिस्ट अशी ख्याती असलेले मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) गुरुवारी अटक केली.

  प्रदीप शर्मा यांची याआधीही एनआयएनं सविस्तर चौकशी केली होती. सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर ७ आणि ८ एप्रिल रोजी एनआयएनं प्रदीप शर्मा यांची दीर्घकाळ चौकशी केली. यावेळी त्यांनी शर्मा यांचे जुने सहकारी सचिन वाझे यांना देखील त्यांच्यासमोर आणून चौकशी केल्याचं सांगितलं गेलं.

  वाझेचे आठवे सहकारी अटकेत

  यापूर्वी प्रदीप शर्मा यांच्याशी संबंधित विकासक संतोष शेलार आणि आशिष जाधव यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रदीप शर्माचा शोध एनआयए करत होती. राज्य राखीव दलाचे पथक शर्मांच्या घराबाहेर तैनात करण्यात आले आहे. प्रदीप शर्मा यांना चौकशीसाठी ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना एन आयए न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सचिन वाझे याला हिरेन हत्या प्रकरणी मदत करणा-या सात जणांना यापूर्वी अटक झाली आहे.

  दोन वेळा एनआयएकडून प्रदीप शर्मांची चौकशी

  मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलिया बाहेर स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणात यापूर्वी दोन वेळा एनआयएकडून प्रदीप शर्मांची चौकशी करण्यात आली आहे. आता त्यांच्याविरोधात नव्याने पुरावे मिळाल्याने मोठी कारवाई केली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  अपयशी राजकीय पदार्पण

  मुंबई पोलिस दलातील माजी पोलिस अधिकारी प्रदिप शर्मा यांनी ११३ गुंडाचे एन्काऊंटर केल्याची नोंद त्यांच्या नावे आहे. जिगरबाज पोलीस आधिकारी म्हणून ते सेवानिवृत्ती नंतर शिवसेनेच्या तिकीटावर २०१९ मध्ये नालासोपारा विधानसभा निवडणूक लढले, मात्र त्यांचा पराभव झाला.

  कोण आहे प्रदीप शर्मा ?

  1- एकूण 113 गँगस्टर्सचा खातमा करणारा एन्काऊटंर स्पेशलिस्ट शर्मा हा 1983 पासून पोलिस दलात कार्यरत होता़

  2 – यापूर्वी लखन भैया बनावट एन्काऊटर प्रकरणात 2010 सालात अटक झाली होती़ त्यानंतर 2013 मध्ये त्याची तुरुंगातून सुटका झाली होती़
  3 – पुढे वाझे याच्याप्रमाणेच पुन्हा मुंबई पोलीस दलात रुजू करुन घेण्यात आले होते़

  4 – 2017 मध्ये त्याने दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला अटक केली होती़ त्यानंतर पोलिस दलाचा राजीनामा देऊन शर्मा याने शिवसेनेत प्रवेश करुन नालासोपारा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती़ पण बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितीज ठाकूर यांनी प्रदीप शर्माला पराभूत केले होते़.

  हे सुद्धा वाचा