
बलात्काराच्या आरोपांमुळे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडलेत. भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून या प्रकरणी सावध प्रतिक्रिया येत आहेत. ‘प्यार किया तो डरना क्या?’, असं म्हणत शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी धनंजय मुंडे यांची बाजू घेतली आहे.
मुंबई : बलात्काराच्या आरोपांमुळे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडलेत. भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून या प्रकरणी सावध प्रतिक्रिया येत आहेत. ‘प्यार किया तो डरना क्या?’, असं म्हणत शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी धनंजय मुंडे यांची बाजू घेतली आहे.
बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेची बहिण करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात दोन मुलं असल्याची कबुली धनंजय मुंडेंनी दिली आहे. मात्र, यानंतरही धनंजय मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रात अपत्यांची तसंच लग्नाची माहिती लपवल्याचा आरोप होत आहे.
भाजपच्या अनेक नेत्यांनी निवडणुकीच्या शपथपत्रात विविध प्रकारची माहिती लपवली आहे. त्या नेत्यांची नावे मी वेळ आल्यास जाहीर करीन असे म्हणत अब्दुल सत्तार यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.
धनंजय मुंडे यांनी त्यांचे संबंध लपवून ठेवलेले नाहीत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी सर्व खुलासा केला आहे. त्यांनी त्यांची बाजू महाराष्ट्रासमोर मांडली आहे. तसंच दोघांच्या संमतीने असलेल्या प्रेमाची कबुली दिली आहे. तर मग प्यार किया तो डरना क्या?”, असं म्हणत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांना वापरलेल्या वाक्याची आठवण करुन दिली.