शिवसेना आमदाराने कंत्राटदाराला कचऱ्यानं घातली आंघोळ, रस्त्यावर साचलेला कचरा त्यांच्या अंगावर टाकला आणि व्हिडिओ व्हायरल…

चांदिवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी चक्क महापालिकेच्या कंत्राटदाराला कचऱ्यानं अंघोळ घातल्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  व्यवस्थित नालेसफाई न केल्यानं आमदार दिलीप लांडे चांगलेच संतापलेले दिसत आहे. तसंच रागाच्या भरात त्यांनी कंत्राटदाराला खाली बसवलं. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना कंत्राटदारावर कचरा टाकायला सांगितला. तसेच कार्यकर्त्यांनी रस्त्यावर साचलेला कचरा त्यांच्या अंगावर टाकला.

    पहिल्या पावसात मुंबईत पाणी साचल्यानं नालेसफाईचे दावे करणाऱ्या महापालिका प्रशासनाला आणि सत्तेत असलेल्या शिवसेनेला विरोधकांकडून प्रश्न विचारले जात आहे. यावरून वाद प्रतिवाद सुरू असतानाच मुंबईतील शिवसेना आमदाराने एका कंत्राटदाराला कचऱ्यानं अघोळ घातली. हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला असून, या घटनेची सगळीकडे चर्चा होत आहे. या सर्व प्रकारावर चांदिवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी स्वतःची भूमिकाही मांडली आहे.

    चांदिवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी चक्क महापालिकेच्या कंत्राटदाराला कचऱ्यानं अंघोळ घातल्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  व्यवस्थित नालेसफाई न केल्यानं आमदार दिलीप लांडे चांगलेच संतापलेले दिसत आहे. तसंच रागाच्या भरात त्यांनी कंत्राटदाराला खाली बसवलं. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना कंत्राटदारावर कचरा टाकायला सांगितला. तसेच कार्यकर्त्यांनी रस्त्यावर साचलेला कचरा त्यांच्या अंगावर टाकला. यावेळी कंत्राटदार आमदारांशी बोलताना दिसत आहे. तसंच रस्त्यावर पाणी तुंबलेलं असल्याचं आणि बराच कचरा साचलेलाही व्हिडिओत दिसत आहे.

    मुंबईत तीन-चार दिवस मुसळधार पाऊस बरसला. मुसळधार पाऊस असल्यानं मुंबईतील अनेक भागांत पाणी साचलं होतं. नालेसफाईवरून शिवसेनेला प्रश्न विचारले जात असतानाच रविवारी शिवसेना आमदाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

    चांदिवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी मांडली भूमिका

    कंत्राटदार त्याचं काम जबाबदारीनं करत नसल्यानं मी हे केलं आहे. मी मागील १५ दिवसांपासून कंत्राटदाराशी संपर्क करतोय. रस्त्याची सफाई करण्याची विनंती करतोय. मात्र, त्याने हे काम केलंच नाही. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्ता साफ करण्याचं कामं सुरू केल्यानंतर कंत्राटदार तिथे आला. नंतर मी त्याला सांगितलं की, ही तुझी जबाबदारी आहे आणि त्याने ते काम केलं पाहिजे,असं म्हणत लांडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.