शिवसेना आमदार अधिवेशनासाठी रवाना, वाटेतच कोरोनाचा विळखा

रायगडमधील अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा मेसेज आला. त्यांनी लगेच माघार घेतली. महेंद्र दळवी घरीच विलगीकरणात राहणार आहेत. पावसाळी अधिवेशनाला जाण्यासाठी त्यांना कोरोना चाचणी केली होती.

रायगड : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेश आजपासून सुरु झाले आहे. त्यासाठी राजकीय नेते अधिवेशनासाठी जात आहेत. रायगडहून मुंबईकडे निघालेल्या आमदाराचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे वाटेतच त्यांना कोरोना झालाचे कळाले आहे.

रायगडमधील अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा मेसेज आला. त्यांनी लगेच माघार घेतली. महेंद्र दळवी घरीच विलगीकरणात राहणार आहेत. पावसाळी अधिवेशनाला जाण्यासाठी त्यांना कोरोना चाचणी केली होती. पंरतु त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. मात्र खबरदारी म्हणून पुढील १० दिवस आपण घरीच क्वारंटाई राहणार आहेत. असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी संपर्कातील कार्यकार्त्यांना तपासणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे.