शिवसेना आमदाराची किरीट सोमय्यांना मानहानीची नोटीस; कुटुंबांची व पक्षाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप

कोलाई व महाकाली येथील जागेच्या खोट्या प्रकरणात बिनबुडाचे आरोप करून जनमानसात आपली, कुटुंबांची व पक्षाची प्रतिमा मलिन करत असल्याप्रकरणी आमदार रविंद्र वायकर यांनी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांना मानहानीची नोटीस पाठविली आहे. या नोटीसीनुसार सोमैय्या यांनी दोन्ही प्रकरणी जाहीर माफी न मागितल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही वायकर यांनी नोटीसीद्वारे दिला आहे.

    मुंबई : कोलाई व महाकाली येथील जागेच्या खोट्या प्रकरणात बिनबुडाचे आरोप करून जनमानसात आपली, कुटुंबांची व पक्षाची प्रतिमा मलिन करत असल्याप्रकरणी आमदार रविंद्र वायकर यांनी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांना मानहानीची नोटीस पाठविली आहे.

    या नोटीसीनुसार सोमैय्या यांनी दोन्ही प्रकरणी जाहीर माफी न मागितल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही वायकर यांनी नोटीसीद्वारे दिला आहे.

    काही महिन्यांपुर्वीच सोमैय्या यांनी मनिषा रविंद्र वायकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी अलिबाग कोर्लाई येथे खरेदी केलेल्या संयुक्त जमिनीवर १९ बंगले असल्याचा तसेच माहिती निवडणूक आयोगाकडे न देता लपविल्याचा दावा केला होता.

    मात्र, यावेळी त्यांनी कुठलेही सबळ पुरावे सादर केले नव्हते. या नोटीसीत सोमैय्या यांनी कुठलेही सबळ पुरावे न देता केलेले आरोप जाहीररित्या मागे घेत जाहीर माफी न मागितल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही वायकर यांनी या नोटीसीद्वारे दिला आहे.