आयकर विभागाच्या मागणीमुळे शिवसेना आमदार यामिनी जाधव यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता

यामिनी यांनी प्रतिज्ञापत्रात सांगितले होते की, त्यांनी प्रधान डीलर्स नावाच्या कंपनीकडून एक कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. जेव्हा तपास केला गेला तेव्हा असे आढळून आले की प्रधान डीलर्स ही एक शेल कंपनी होती जी कोलकातामध्ये एंट्री ऑपरेटर उदय महावार चालवतात. उदय महावार हे तेच आहेत ज्यांचे नाव नॅशनल हेरॉल्ड प्रकरणातही आले होते. चौकशी दरम्यान, 15 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे.

    शिवसेनेच्या भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार यामिनी यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाने खोटी माहिती दिल्याचा ठपका ठेवला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत यामिनी जाधव यांनी एमआयएमच्या वारीस पठाण यांचा पराभव केला होता. त्यांनी त्यावेळी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीबाबत चुकीची माहिती दिल्याचा आयकर विभागाचा दावा आहे. प्रतिज्ञापत्रात संपत्ती विषयी चुकीची माहिती दिल्याने आयकर विभागाने विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

    काय आहे आयकर विभागाची नेमकी मागणी?

    २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी यामिनी जाधव यांनी संपत्तीबाबत प्रतिज्ञापत्रासोबत दिलेल्या माहितीची पडताळणी केली असता तपासात असेही उघड झाले की कोलकाताच्या शेल कंपन्यांमार्फत काही व्यवहार केले गेले, ज्यातून यामिनी, तिचे पती आणि कुटुंबातील सदस्यांनी करोडो रुपये कमावले.

    यामिनी यांनी प्रतिज्ञापत्रात सांगितले होते की, त्यांनी प्रधान डीलर्स नावाच्या कंपनीकडून एक कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. जेव्हा तपास केला गेला तेव्हा असे आढळून आले की प्रधान डीलर्स ही एक शेल कंपनी होती जी कोलकातामध्ये एंट्री ऑपरेटर उदय महावार चालवतात. उदय महावार हे तेच आहेत ज्यांचे नाव नॅशनल हेरॉल्ड प्रकरणातही आले होते. चौकशी दरम्यान, 15 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे.

    त्यामुळे आयकर विभागाने यामिनी जाधव यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी आयकर विभागाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात यामिनी जाधव यांनी आपल्याकडे ७.५ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे नमूद केले होते. यामध्ये २.७४ कोटींची जंगम मालमत्ता असल्याचे तर पती यशवंत जाधव यांच्या नावावर ४.५९ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले होते. यामध्ये १.७२ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे त्यांनी म्हटले होते.