fire in forest

अँजीओग्राफी केल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर शस्त्रक्रिया (treatment ) करण्यासाठी एप्रिल २०२०ची वेळ नियोजित करण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती पुढे ढकलण्यात आली होती.

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल होणार आहेत. संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. राऊत गेल्या काही दिवसांपासून ह्रदयविकार (heart ailments )संबंधित विकारावर उपचार (treatment) घेत आहेत. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये संजय राऊत यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या ह्रदयात २ ब्लॉकेज असल्यामुळे गेल्या वर्षी २ स्टेन टाकल्या आहे. त्यामुळे त्यांच्यावर परत अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

मागील वर्षी अँजीओग्राफी केल्यानंतर संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी एप्रिल २०२०ची वेळ नियोजित करण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती पुढे ढकलण्यात आली होती. संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया डॉ मॅथ्यू हे प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ आणि डॉ. अजित मेनन, हृदयविकार तज्ज्ञ करणार आहेत. यापूर्वीही ह्याच तज्ज्ञ डॉक्टरांनी संजय राऊत यांच्यावर उपचार केला होता.

संजय राऊत यांची प्रकृती उत्तम असून त्यांना थोडा थकवा आणि ताण जाणवत आहे. राऊत आज लीलावती रुग्णालयात दाखल झाल्यावर उद्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. संजय राऊत हे नेहमी चर्चेत असतात. राऊतांचे वक्तव्ये कायम वादाच्या मुद्द्यावर असतात.