Shiv Sena must become Prime Minister; Sanjay Raut's decision to take Uddhav Thackeray to Delhi

मुंबई : मुख्यमंत्रीपदाची स्वप्नपूर्ती झाल्यानंतर आता शिवसेनेला पंतप्रधान पदाचे वेध लागले आहेत. शिवसेनेचा पंतप्रधान झालाच पाहिजे असे मत  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. उद्धव ठाकरेंना दिल्लीपर्यंत घेऊन जाण्याचा निर्धारही संजय राऊत यांनी बोलून दाखवला आहे.

पुढच्या विधानसभेला शिवसेनेचे १०५ आमदार असतील असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपला जबरदस्त टोला लगावला आहे. महापालिकेत ज्यांनी आव्हान दिले आहे की शिवसेनेचा भगवा उतरवू, त्यांच्या छाताडावर उभे राहून भगवा फडकवून दाखवू अस म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.

पुणेरी पगडी वेगळी असते. पेशव्यांची पगडी वेगळी आहे. ही पगडी म्हणजे संकेत आहे. बाजीराव पेशव्यांनी दिल्लीपर्यंत आपले साम्राज्य नेलं होतं. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्लीपर्यंत घेऊन जायचं. आपला पंतप्रधान व्हायला हवा, असंही संजय राऊत म्हणाले.

म्ही काही करा, कोणी कितीही अडथळे आणून द्या, कोर्टाने काही आदेश देऊ द्या. कांजूरचं कारशेड कांजूरलाच होणार असेही संजय राऊत यांनी यावेळी ठामपणे सांगीतले.