शिवसेना-राष्ट्रवादीचेच नेते भाजपाचे मंत्री; शिवसेनेचा राणे, पाटील, भारतींवर निशाणा

भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आभार मानले पाहिजेत. आमच्याकडून जो पुरवठा झाला आहे त्यामुळेच महाराष्ट्रातून मंत्रीमंडळात चेहरे मिळाले आहेत. कपिल पाटील हे राष्ट्रवादीचे प्रॉडक्ट आहे. भारती पवार या पूर्णपणे राष्ट्रवादीचे प्रॉडक्शन आहे. नारायण राणे हे शिवसेना, काँग्रेस करत भाजपात गेले आहेत. मंत्रिमंडळाचा मूळ चेहरा शिवेसना राष्ट्रवादीचाच आहे असे टीकास्त्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोडले.

  मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावरून शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातून ज्या नेत्यांचा मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आला आहे ते शिवसेना-राष्ट्रवादीचेच नेते होते, असे ते म्हणाले. या नेत्यांना आम्ही वाढविले म्हणूनच भाजपाला मंत्रिपदासाठी नवे चेहरे मिळाले असल्याचा टोमणाही त्यांनी हाणला.

  भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आभार मानले पाहिजेत. आमच्याकडून जो पुरवठा झाला आहे त्यामुळेच महाराष्ट्रातून मंत्रीमंडळात चेहरे मिळाले आहेत. कपिल पाटील हे राष्ट्रवादीचे प्रॉडक्ट आहे. भारती पवार या पूर्णपणे राष्ट्रवादीचे प्रॉडक्शन आहे. नारायण राणे हे शिवसेना, काँग्रेस करत भाजपात गेले आहेत. मंत्रिमंडळाचा मूळ चेहरा शिवेसना राष्ट्रवादीचाच आहे असे टीकास्त्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोडले.

  जावडेकर बळीचा बकरा

  मोदी कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील भाजपा नेते प्रकाश जावडेकर चांगले काम करीत होते परंतु त्यांना बळीचा बकरा बनविण्यात आले, अशी टीका राऊत यांनी केली. यावेळी राणेंना देण्यात आलेल्या लूक्ष्म लघु उद्योग मंत्रालयावरून टोमणा हाणला. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. अनेक मंत्रीपद त्यांनी भूषवली आहेत. राणेंसमोर कोरोना काळात कोलमडलेल्या अनेक छोट्या उद्योगांना संजीवनी देण्याचे आव्हान आहे, असे ते म्हणाले.

  मोदींनीच राजीनाम द्यायला हवा होता

  केंद्रीय मंत्रिमंडळातून आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच राजीनामा द्यायला हवा होता. मोदी स्वत:च अपयशी ठरले आहेत. मोदी कॅबिनेटमध्ये चांगले काम करणाऱ्या मंत्र्यांना हटविण्यात आले तर भ्रष्ट मंत्र्यांना बढती देण्यात आली. केंद्रीय मंत्री संजय धोत्रे चांगले काम करीत होते परंतु त्यांनाही कॅबिनेटमधून हटविण्यात आले अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.