sanjay raut

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्षा येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाली असल्याचं समजत आङे. तसेच त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. संजय राऊत म्हणाले की, बिहारमधील निवडणुकीबद्दल कोणताही फॉर्म्युला तयार झाला नाही आहे. तेथील काही लहान पक्षांना शिवसेनेसोबत काम करायचं आहे. त्यातील काही पक्ष हे जिल्हास्तरावरचे आहेत.

मुंबई : बिहार विधानसभा निवडणूक ( Bihar elections ) जवळ काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे बिहारमधील राजकीय वातावरण तापलं आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासमोर सत्ता राखण्याचं आव्हान आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्ष गमावणाऱ्या भाजपच्या दृष्टीनंदेखील बिहारमधील निवडणूक अतिशय महत्तवाची आहे. त्यातच शिवसेनादेखील (Shivsena)  बिहारमध्ये निवडणूक लढवणार असल्याचे निवडणूकीची तयारी सुरु केली आहे. बिहारमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससोबत (NCP) निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्षा येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाली असल्याचं समजत आङे. तसेच त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. संजय राऊत म्हणाले की, बिहारमधील निवडणुकीबद्दल कोणताही फॉर्म्युला तयार झाला नाही आहे. तेथील काही लहान पक्षांना शिवसेनेसोबत काम करायचं आहे. त्यातील काही पक्ष हे जिल्हास्तरावरचे आहेत.

शिवसेना बिहारमध्ये ४० ते ५० जागा लढवेल. मात्र अजूनही युतीबाबत कोणाशीही चर्चा केली नाही. मी पुढील आठवड्यात जाणार आहे. तेव्हा तिथल्या नेत्यांशी चर्चा करणार असून त्यावर निर्णय होईल असे संजय राऊत म्हणाले आहेत. भाजपला रोखण्यासाठी शिवसेना प्रयत्न करतेय का असा प्रश्ना राऊतांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, बिहारमध्ये भाजपला रोखण्याइतकी ताकद आमच्यात नाही. असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.