शिवसेना प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर, संजय राऊतांसह ‘त्या’ खासदाराला मुख्य प्रवक्तेपद, नव्या यादीत कोणाला स्थान नाही?

आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सचिन अहिर, शीतल म्हात्रे, डॉ. शुभा राऊळ, आनंद दुबे यांसारख्या नव्या नेत्यांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी वर्णी लावल्याचं चित्र आहे. याशिवाय अ‍ॅड. अनिल परब, सुनील प्रभू, किशोरी पेडणेकर यांसारख्या प्रवक्त्यांना पुनर्नियुक्त करण्यात आले आहे. तर नाराज नेते भास्कर जाधव यांनाही प्रवक्तेपद देण्यात आले आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुका लक्षात घेत विधानपरिषद आमदार अंबादास दानवे यांनाही प्रवक्तेपदाची धुरा मिळाली आहे.

  मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशाने, तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या सूचनेने शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

  आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सचिन अहिर, शीतल म्हात्रे, डॉ. शुभा राऊळ, आनंद दुबे यांसारख्या नव्या नेत्यांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी वर्णी लावल्याचं चित्र आहे. याशिवाय अ‍ॅड. अनिल परब, सुनील प्रभू, किशोरी पेडणेकर यांसारख्या प्रवक्त्यांना पुनर्नियुक्त करण्यात आले आहे. तर नाराज नेते भास्कर जाधव यांनाही प्रवक्तेपद देण्यात आले आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुका लक्षात घेत विधानपरिषद आमदार अंबादास दानवे यांनाही प्रवक्तेपदाची धुरा मिळाली आहे. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना नव्या यादीत स्थान मिळालेले नाही.

  शिवसेना प्रवक्तेपदी कोण कोण?

  सचिन अहिर – शिवसेना उपनेते (नवीन वर्णी)
  भास्कर जाधव – आमदार (रत्नागिरी) (नवीन वर्णी)
  अंबादास दानवे – विधानपरिषद आमदार (औरंगाबाद-जालना) (नवीन वर्णी)
  मनिषा कायंदे – विधानपरिषद आमदार (नवीन वर्णी)
  डॉ. शुभा राऊळ – माजी महापौर (मुंबई) (नवीन वर्णी)
  किशोर कान्हेरे (नागपूर) (नवीन वर्णी)
  संजना घाडी (नवीन वर्णी)
  आनंद दुबे (मुंबई) (नवीन वर्णी)

  नव्या यादीत कोणाला स्थान नाही?

  धैर्यशील माने – खासदार (कोल्हापूर)
  डॉ. नीलम गोऱ्हे – विधानपरिषद आमदार
  गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा मंत्री
  उदय सामंत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री