
देशात अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीचा शिवसेना स्टाईलने निषेध करण्यात आला आहे. शिवसेनेच्या युवा विंग म्हणजे युवा सेनेमार्फत मुंबईच्या खार, वांद्रे, सांताक्रुझ आणि इतर ठिकाणी रात्रीच्या वेळी अनेक पेट्रोल पंप, चौकात मोठ्या प्रमाणावर पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीच्या विरोधात बॅनर लावण्यात आलेत.
मुंबई : देशात अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीचा शिवसेना स्टाईलने निषेध करण्यात आला आहे. शिवसेनेच्या युवा विंग म्हणजे युवा सेनेमार्फत मुंबईच्या खार, वांद्रे, सांताक्रुझ आणि इतर ठिकाणी रात्रीच्या वेळी अनेक पेट्रोल पंप, चौकात मोठ्या प्रमाणावर पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीच्या विरोधात बॅनर लावण्यात आलेत.
या पोस्टरच्या माध्यमातून शिवसेनेने पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध करत थेट मोदी सरकारवर निशाणा साधला. यामध्ये २०१५ आणि यानंतर २०२१ पर्यंत गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती किती वाढल्या आहेत याची दरासहित तुलना करण्यात आली आहे. हेच अच्छे दिन आहेत का ? असा थेट सवालही बॅनरच्या माध्यमातून उपसिथित करण्यात आला आहे.
पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीसाठी केंद्रातली मोदी सरकार हेच जबाबदार आहे असा आरोप करत याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या गंभीर इशारा युवा सेने तर्फे देण्यात आला आहे.