उद्धव ठाकरेंविरूद्ध अपशब्द वापरणाऱ्यांचे हात छाटण्याची शिवसेनेत धमक; विनायक राऊतांचा इशारा

नारायण राणेंनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, मा. उद्धवजी ठाकरे असतील किंवा इतर शिवसेना नेते असतील यांच्याबद्दल वाईट वक्तव्य करणाऱ्यांचे हात छाटण्याची धमक आम्हा मावळ्यांमध्ये आहे. हे कदापी राणेंनी विसरू नये, असा इशारा विनायक राऊत यांनी राणेंना दिला आहे.

    मुंबई : मोदी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात राज्यातील काही नेत्यांची मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने राज्यात जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. मुंबई महापालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी नारायण राणे हे शिवसेनेवर जास्तच आक्रमक होताना दिसत आहेत.

    दरम्यान स्वता:च्या राजकीय स्वार्थासाठी नेहमीच चाटूगिरीची सवय लागलेल्या नारायण राणेंना केंद्र सरकारमध्ये मंत्रीपद मिळाल्यानंतर मानसिक संतूलन बिघडलेलं आहे. इथे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या बद्दल असं वक्तव्य करणाच्याऐवजी त्यांनी उत्तर प्रदेशचे पूर्व मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी ज्या तिरंग्यावर ज्या नतद्रष्टांनी भाजपचा झेंडा ठेवला होता. त्यांचे आधी हात छाटावे, असं जोरदार प्रत्युत्तर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिलं आहे.

    तसेचं ते पुढे म्हणतात की, नारायण राणेंनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, मा. उद्धवजी ठाकरे असतील किंवा इतर शिवसेना नेते असतील यांच्याबद्दल वाईट वक्तव्य करणाऱ्यांचे हात छाटण्याची धमक आम्हा मावळ्यांमध्ये आहे. हे कदापी राणेंनी विसरू नये, असा इशारा विनायक राऊत यांनी राणेंना दिला आहे.

    राऊत यांनी त्यांच्या ट्विटरवरून एका व्हिडीओच्या माध्यमातून राणेंना प्रत्युत्तर दिलं आहे. काल जन आशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरेेंवर टीका केली होती. मी उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लगावली असती, असं राणे बोलले होते. यानंतर राज्याती राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.