शिवसेना भाजपसह पुन्हा युती करणार? शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोठ वक्तव्य

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी घातलेला गोंधळ व सरकारने 12 आमदारांना निलंबित करून दिलेले चोख प्रत्युत्तर यामुळे भाजप आणि शिवसेनेतील मैत्रीचे अंतर एकाच दिवसात प्रचंड वाढले. याउलट, काँग्रेस व राष्ट्रवादी शिवसेनेसोबत याच घटनाक्रमात चांगला सलोखा निर्माण केला. त्याचे प्रत्यंतर पावसाळी अधिवेशन संपल्यावर झालेल्या माध्यमांपुढच्या संवादातून दिसून आले.

    मुंबई : एकीकडे भाजपकडून युतीसाठी शिवसेनेला चुचकारणे सुरू असतानाच, पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने उद्भवलेल्या गोंधळानंतर स्वत: शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युतीची शक्यता फेटाळली आहे. गेल्या 30 वर्षांत एकत्र राहून जे झाले नाही ते आता पुढे काय होईल अशा शब्दात त्यांनी युतीची शक्यता नाकारली.

    विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी घातलेला गोंधळ व सरकारने 12 आमदारांना निलंबित करून दिलेले चोख प्रत्युत्तर यामुळे भाजप आणि शिवसेनेतील मैत्रीचे अंतर एकाच दिवसात प्रचंड वाढले. याउलट, काँग्रेस व राष्ट्रवादी शिवसेनेसोबत याच घटनाक्रमात चांगला सलोखा निर्माण केला. त्याचे प्रत्यंतर पावसाळी अधिवेशन संपल्यावर झालेल्या माध्यमांपुढच्या संवादातून दिसून आले.

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मी या दोघांच्या मध्ये (अजित पवार व बाळासाहेब थोरात) आहे. त्यातून बाहेर कसा निघू’ असे सांगून राजकारणात अपेक्षित बदल होणार नाहीत. व सरकारलाही धोका नाही, असे संकेत दिले. तथापि, दोनच दिवसांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आमचा शत्रू नाही, वैचारिक मतभेद आहेत असे स्पष्ट सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनाने मनसुब्यांवर पाणी फेरले.