To run Thackeray's birth party; They were not born to run the state; BJP leader's harsh criticism

शिवसेना युवा नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आदित्य ठाकरे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. यामुळे आता मुख्यमंत्री तथा आदित्य यांचे वडिल उद्धव ठाकरे क्वारन्टाईन होण्याची शक्यता आहे.

    मुंबई : शिवसेना युवा नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आदित्य ठाकरे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. यामुळे आता मुख्यमंत्री तथा आदित्य यांचे वडिल उद्धव ठाकरे क्वारन्टाईन होण्याची शक्यता आहे.

    आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करीत याबाबत माहिती दिली आहे. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या असे ट्विट आदित्य ठाकरेंनी केले आहे.

    दरम्यान, देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याची स्थिती निर्माण झाली आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. विदर्भात चिंताजनक स्थिती आहे. अशातच नुकतचं आदित्य ठाकरे नागपुरच्या ताडोबा अरण्याची सफर करुन आले आहेत. आदित्य यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांचे वडिल उद्धव ठाकरे तसेच कुटुंबातील इतर सदस्यांना क्वारन्टाईन व्हावे लागणार आहे. शिवसेनेतील अनेक मंत्री आणि नेत्यांना आतापर्यंत कोरोनाची झाली आहे.