shiv sena asks central government to stop use of loudspeakers on mosques vb

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात दबदबा असलेले शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख तथा ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी शिवसेना पक्ष सदस्यत्वासह आपला ठाणे जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

    मुंबई : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात दबदबा असलेले शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख तथा ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी शिवसेना पक्ष सदस्यत्वासह आपला ठाणे जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

    शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्याकडे शनिवारी त्यांनी आपला राजीनामा सोपविला. त्यांच्या राजीनाम्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिवसेनेला मोठे खिंडार पडणार आहे. ते लवकरच काँग्रेसमध्ये जातील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.