Best's fleet will include state-of-the-art double decker buses; Sophisticated facilities with two doors, two stairs, CCTV cameras

मुंबई  : गेल्या एका दशकाहून अधिक काळ आर्थिक संकटातून जाणाऱ्या बेस्ट उपक्रमाला स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी पालिकेत विलिन करण्यास शिवसेना तयार झाली आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पालिका प्रशासनाला सभागृहात मंजूर प्रस्तावाला कार्यान्वित करण्यासाठी सरकार स्तरावर प्रयत्न करावेत, असे र्निदेश दिले आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागणीवर बेस्टला पालिकेत विलिन करण्यासा प्रस्ताव सभागृहात मंजूर करण्यात आला होता आणि आता हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे.

मनपा स्थायी समितीच्या बैठकीत बेस्ट अर्थसकल्प सादर करताना समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले की, तोट्यात चालणाऱ्या बेस्टला किती दिवस अनुदान द्यायचे. त्यापेक्षा बेस्टला महापालिकेत विलिन करण्यात यावे. तसेच पालिकेकडून बेस्टला मिळणारा अनुदानाच्या योग्य विनियोग होत नसल्याचाही आरोप करत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

तोट्यातून बाहेर येण्यासाठी पालिकेने आता बेस्टला २ हजार ५०० कोटींचे अनुदान दिले आहे. याशिवाय बेस्टला आतापर्यंत सुमारे २ हजार कोटींचा तोटा झाला आहे. बेस्टला वारंवार मदतनिधी देण्याऐवजी पालिकेमध्येच विलिन करण्याचे शिवसेनेकडून प्रयत्न होत आहेत. बेस्टला पालिकेत विलिन करण्यासाठी मनपा सभागृहात सर्वपक्षीयांनी मंजुरी दिली आहे आणि प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे.

बेस्ट प्रशासनातर्फे सादर केलेल्या २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात १८८७ कोटींचा तोटा असणारा बजेट बेस्टच्या स्थायी समितीने मंजूर करून पालिकेकडे पाठवला आहे. यावर चर्चा सुरू आहे. बुधवारी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांिगतले की, मदतनिधी देऊनही बेस्ट तोट्यातच आहे. त्यामुळे आता बेस्टला विलिन करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर बेस्टला पालिकेत विलिन करण्यात येईल.