Shiv Sena's Dussehra rally this year not on Shiv Tirtha but in Shanmukhanand Hall! Will the trumpet of Mahapalika propaganda sound

    मुंबई : आगामी वर्षात होवू घातलेल्या मुंबई आणि अन्य महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा(Shiv Sena’s Dussehra rally) मोठ्या प्रमाणात होणार आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा गेल्या दोन वर्षापासून कोविड-१९ निर्बंधामुळे होवू शकला नाही. गेल्यावर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात मर्यादीत स्वरूपात दसरा मेळावा पार पडला होता. मात्र यंदा षण्मुखानंद सभागृहात अधिक मोठ्या प्रमाणात दसरा मेळावा पार पडणार आहे.

    षण्मुखानंद सभागृहात दसरा मेळावा

    षण्मुखानंद सभागृहात या पूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्याअनेक सभा झाल्या आहेत. मात्र त्यांची कारणे वेगळी होती. यंदा दसरा मेळावा  षण्मुखानंद मध्येच पार पडणार आहे. या जागेलाही वेगळी परंपरा आहे. दाक्षिणात्यांविरोधात लढा देणा-या सेनेचा मेळावा दाक्षिणात्यांच्या मोठ्या सभागृहात घेण्यामागचा इतिहास वेगळा आहे असे जुने शिवसैनिक सांगतात. सभागृहाच्या ५० टक्के उपस्थितीत दसरा मेळावा पार पडणार आहे. त्यासाठी शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते उपनेते, मंत्री, मुंबईचे आमदार, महापौर आणि मुंबई महानगरपालिकेचे महत्वाचे नगरसेवक या दसरा मेळाव्याला निमंत्रीत राहतील. यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार नाही. तो नियम आणि संकेत पाळून कशा पद्धतीने साजरा करता येईल, याचे नियोजन सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचीही तशी इच्छा आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते.

    शिवतिर्थ, शिवसेनेचा इतिहास आणि श्रध्दास्थान

    शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जुनी परंपरा आहे. २०१० साली एका जनहित याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाने या मैदानात कोणत्याही राजकीय पक्षाच्या सभांना परवानगी न देण्याचा आदेश दिला. या सभांमुळे येथे ध्वनिप्रदूषण होते आणि हा परिसर शांतता क्षेत्रात येतो, असा युक्तिवाद करण्यात आला. तेव्हा सर्वात प्रथम दसरा मेळावा होणार किंवा नाही असा प्रश्न निर्माण झाला होता, त्यावेळी शिवसेनेकडून या सभेत ६० डिग्रीपेक्षा अधिक आवाज केला जाणार नाही, त्यावेळी उच्च न्यायालयाने यंदाच्या वर्षी सभा घ्या मात्र पुढच्या वर्षी पर्यायी व्यवस्था करावी लागेल. मात्र राज्यात युतीचे सरकार होते, त्यामुळे दसरा मेळाव्याला राजकीय सभेऐवजी सांस्कृतिक स्वरूप देण्यात आले. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिवाजी पार्कमध्येच अंतिम संस्कार करण्यात आले त्यामुळे येथे दसरा मेळावा घेण्यामागे शिवसेनेसाठी भावनिक आणि ऐतिहासिक दोन्ही पार्श्वभुमी आहे.