शिवतीर्थावर जाण्यासाठी नारायण राणे यांना शिवसेनेचा ग्रीन सिग्नल…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे. नारायण राणेंची यात्रा आधी बाळासाहेब ठेकरेंच्या स्मृतीस्मारका वरून सुरु होणार आहे. जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करणाऱ्या नारायण राणे यांना शिवतीर्थावर जाण्यासाठी शिवसेनेने ग्रीन सिग्नल दिला आहे.

  मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे. नारायण राणेंची यात्रा आधी बाळासाहेब ठेकरेंच्या स्मृतीस्मारका वरून सुरु होणार आहे. जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करणाऱ्या नारायण राणे यांना शिवतीर्थावर जाण्यासाठी शिवसेनेने ग्रीन सिग्नल दिला आहे.

  राणे बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाच्या दर्शनासाठी आल्यानंतर कुठलाही विरोध न करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. शिवसेनेचे स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी सांगितलं कि, ” ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर असंख्य लोक येतात. आज जर कुणी आले तर त्याला विरोध करण्याचे कारण नाही. आमच्या पक्षनेतृत्वाने त्यांना रोखण्याचे असे कुठलेही आदेश दिलेले नाहीत.मुळात कोण कधी पाया पडतो याला महत्त्व आहे. त्यामुळे ते आले काय आणि गेले काय याला फरक पडत नाही”, अशी माहिती दिली आहे.

  दरम्यान नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आज(१९ ऑगस्ट) सुरुवात होणार आहे. मात्र त्यांच्या एन्ट्री आधीच त्यांचे पोस्टर्स काढण्यात आले आहेत. शिवसेनेच्या गड असलेल्या शिवाजी पार्कात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला राणे वंदन करतील. तसंच तिथल्या परिसरात वृक्षारोपण देखील करणार आहेत. तिथपासून जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात होणार आहे.

  मात्र या यात्रेवर पावसाचं सावट आहे. मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस बरसत आहे. त्यातच मुंबई मनपाने माहिम , शिवाजी पार्क भागात नारायण राणे यांचे शुभेच्छा बॅनर हटवले. मुंबई मनपा कर्मचाऱ्यांनी अनधिकृत बॅनरवर कारवाई करत, या भागातील बॅनर हटवले आहेत.

  … तिथे शिवसेनेचाच विजय

  “राणे ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेविरोधात उभे राहतात, तिथे तिथे शिवसेनेचाच विजय होतो हा इतिहास आहे. राणेंचं पानिपत करण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे. राणे समोर असल्यावर ही ताकद आणखीनच वाढते. त्यामुळे भाजपने राणेंवर मुंबईच काय ठाणे महापालिका आणि इतर महापालिकेची जबाबदारी दिली तरी सर्वत्र शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही”, असं ते म्हणाले आहेत.