अर्णब गोस्वामी विरोधात हक्कभंग केल्याचा शिवसेनेचा प्रस्ताव, अधिवेशनात प्रचंड गोंधळ

विधीमंडळात पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच शिवसेना आमदारांनी पत्रकार अर्णब गोस्वामी याच्याबाबत गोंधळ केला. मुख्यमंत्र्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्या प्रकरणी अर्णब गोस्वामी याच्या विरोधात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव आणला.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आता राजकीय हस्तक्षेप झाला आहे. या प्रकरणाला राजकीय रंग लागला आहे त्यामुळे सेना आणि भाजप तसेच रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यात शाब्दिक चकमकी होत आहेत. दरम्यान अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी नावाने उल्लेख होता. यावर आजा विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेना आमदारांनी मोठा गोंधळ घातला होता.

विधीमंडळात पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच शिवसेना आमदारांनी पत्रकार अर्णब गोस्वामी याच्याबाबत गोंधळ केला. मुख्यमंत्र्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्या प्रकरणी अर्णब गोस्वामी याच्या विरोधात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव आणला.

अधिवेशनात प्रताप सरनाईक म्हणाले की, अर्णब गोस्वामी हेतुपरस्पर आणि दुष्ट बुद्धीने वाईट बोलत आहेत. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात नेत्यांचा काहीही संबंध नाही. मात्र अर्णब गोस्वामी दिशाभूल करत आहे. त्यांचे रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनी बंद करण्यात यावी. अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

तसेच राज्याचे परिवहन मंत्री म्हणाले की, अर्णब गोस्वामी स्वतःच खटला चालवत आहेत आणि निकाल देत आहेत. त्यामुळे रिपब्लिक टिव्ही वाहिनी बंग करण्यात यावी आणि त्यांच्याविरोधात हक्कभंगाचा गुन्हा करावा. अशी शिवसनेने मागणी केली आहे.